शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत अधांतरीच सुटले शेतकऱ्यांचे चुका-यांसाठीचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:07 IST

तालुक्यातील आडगाव येथील ८ शेतक-यांनी हमीभाव केंद्रावर विकलेल्या शेतामालाच्या चुका-यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शासनाच्या नव्हे, तर गावातीलच एकाच्या हमीवर सोडवले. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे प्रकरण हातघाईवर आले होते.

ठळक मुद्देदोघांची प्रकृती बिघडली होतीचिंताग्रस्त ग्रामस्थांनीच घेतली चुका-यांची हमी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील आडगाव येथील ८ शेतक-यांनी हमीभाव केंद्रावर विकलेल्या शेतामालाच्या चुका-यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण शासनाच्या नव्हे, तर गावातीलच एकाच्या हमीवर सोडवले. दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे प्रकरण हातघाईवर आले होते.२५ जानेवारीपासून उपोषण सुरू असतानाही प्रशासनाने दखलही घेतली नाही. शेवटी सातव्या दिवशी विलास मुटकुळे व केशव मुटकुळे या दोघांची प्रकृती बिघडली. त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केल्याची खबर आडगावात पोहोचली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. नातेवाईक व ग्रामस्थ चिंतेत सापडले होते.दोघांना रूग्णालयात दाखल केले. प्रशासन उपोषणार्थींची दखल घेत नाहीत, म्हणून गावातील पांडुरंग सोनाजी मुटमुळे, सरपंच प्रशांत कंधारकर, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी दत्तराव मुटकुळे यांनी आपसात चर्चा करून उपोषणापासून शेतकºयांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांसह हे सर्वजण जिल्हा कचेरीसमोर उपोषणस्थळी बुधवारी दुपारी पोहोचले. पांडुरंग मुटकुळे यांनी चुकाºयाची रक्कम स्वत: देण्याची हमी दिली. सरपंच प्रशांत कंधारकर व दत्तराव मुटकुळे यांनी जवाबदारी स्वीकारली. शेवटी शब्दांचा मान राखत उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शविली. प्रशासन उपोषणाथीर्ची दखल घेत नसल्यामुळे ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन शेतक-यांचे उपोषण सोडविले.मुख्यमंत्रीमित्र म्हणतो, सोयाबीनच परत करा !सोयाबीनची नोंदणी केल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आलेल्या संदेशाप्रमाणे हिंगोली येथील हमीभाव केंद्रावर ९ नोव्हेंबर रोजी ३४ डाग सोयाबीनची विक्री केल्यानंतर अजूनही त्याची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार बाबाराव घुगे यांनी मार्केटिंग अधिकारी परभणी यांच्याकडे केली आहे. यासाठी अनेकदा पाठपुरावा केला. २२ जानेवारी रोजी हमी केंद्र चालविणारे पवार व मॅनेवार यांनी तुम्ही नियमापेक्षा जास्त माल दिल्याने कुठेही जाऊ शकता, असे सांगून धुडकावून लावले. त्यामुळे आता माझे सोयाबीनच परत करा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. बाबाराव घुगे हे मुख्यमंत्रीमित्र असून इतरांची मदत करण्यास भाजपने ही सोय केली. मात्र त्यांनाच कोणी मदतीला धावत नाही.