शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
6
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
7
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
8
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
9
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
10
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
11
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
12
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
13
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
14
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
15
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
16
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
18
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
19
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
20
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच

हिंगोलीत १७९ पैकी ९0 योजनांचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:37 IST

जिल्ह्यात विविध योजनांमध्ये घेतलेल्या मात्र कामे पूर्ण न झालेल्या नळयोजनांसाठी आता जि.प.ने नियोजन केले आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग कामाला लागला आहे. १७९ योजनांचे नियोजन यात केलेले आहे.

ठळक मुद्देवर्षानुवर्षे रखडल्या नळयोजना : जि.प.ने केले नियोजन, पुरेसा निधी नसल्याने प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात विविध योजनांमध्ये घेतलेल्या मात्र कामे पूर्ण न झालेल्या नळयोजनांसाठी आता जि.प.ने नियोजन केले आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग कामाला लागला आहे. १७९ योजनांचे नियोजन यात केलेले आहे.गतवर्षी जवळपास २६0 योजना प्रलंबित होत्या. मात्र त्यावेळी अशीच मोहीम राबविल्यानंतर ४५ योजनांचे कामे पूर्ण करण्यात आली होती. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांच्या बैठका घेवून गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही न बधलेल्या समित्याच आता उरल्या आहेत. या अपूर्ण योजनांबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच त्याचे जि.प.ने नियोजन केले आहे. आता जर या समित्या काम पूर्ण करणार नसतील तर गुन्हे दाखल करण्यासह इतरही कारवाई करण्याचे संकेत दिसत आहेत.कोट्यवधीचा निधी खर्च झाल्यानंतरही योजना प्रलंबित असल्याने अनेक गावांत ग्रामस्थांना पाणीच मिळत नाही. काही ठिकाणी फक्त गावात पाणी आले तर दारात नळ आला नाही. काही ठिकाणी तर हेही झालेले नाही. मात्र आता काही ठिकाणच्या योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण दाखवून या झंझटीतून मुक्त होण्याची घाई पाणीपुरवठा विभागाला झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अशा योजना १२१ असल्याचे अहवालात म्हटले आहे. यापैकी ६0 योजना या आर्थिक वर्षाअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यात औंढ्यातील प्रलंबित २७ पैकी १0, वसमतला ३५ पैकी १२, कळमनुरीत ३५ पैकी १७, हिंगोलीत ११ पैकी १0, सेनगावात १३ पैकी ११ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण पण आर्थिकदृष्ट्या अपूर्ण असल्याचे सांगून अंतिम करण्याचे नियोजन आखलेले आहे. ही बाब केवळ कागदोपत्रीच करायची असल्याने याला गतीही येवू शकते. लोकप्रतिनिधींनी याची तपासणी करण्याची गरज आहे. योजना अंतिम करण्याच्या नादात ती अर्धवट राहता कामा नये.५८ गावे : नुसते पाणी पोहोचलेकेवळ गावात पाणीपुरवठा सुरू केलेल्या मात्र अपूर्ण असलेल्या योजना ५८ आहेत. त्यापैकी ३0 या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यात औंढ्यात ११ पैकी ५, वसमतला ११ पैकी ५, कळमनुरीत १४ पैकी ८, हिंगोलीत ८ पैकी ५, सेनगावात १४ पैकी ७ योजनांचा समावेश आहे. या योजना पूर्ण करण्याचे नियोजन आखले आहे. काही योजनांना पुरेल एवढाच निधी आहे. मात्र त्यावर मात करून ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यादृष्टिनेच नियोजन केल्याचे अतिरिक्त मुकाअ ए.एम.देशमुख यांनी सांगितले.