शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासियांचेही निकालाकडे डोळे

By admin | Updated: May 17, 2014 00:36 IST

हिंगोली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागल्याने हिंगोली शहरात दुपारपर्यंत सन्नाटा होता.

 हिंगोली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागल्याने हिंगोली शहरात दुपारपर्यंत सन्नाटा होता. ग्रामीण भागातून शहराकडे येणारा लोंढा आज दिसला नाही तर शहरातील नागरिकांचे डोळे टिव्हीकडे लागले होते. काहींनी निकाल ऐकण्यासाठी कामे थांबविल्याने शहरात दिसणारी गर्दी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर दिसून आली. परिणामी शहरातील दवाखाने ओस पडले होते, मार्केट थंड होते, बाजारात शुकशुकाट होता, रस्ते गर्दीविना सुने होते, बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकात बस प्रवाशांच्या वाट पाहत होत्या. पहिल्यांदाच हिंगोली शहर थांबल्याचे दिवसभर असलेले हे चित्र निकाल लागताच पालटून गेले. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर गर्दी केली होती. दुसरीकडे कामानिमित्त शहराकडे ग्रामीण भागातून येणारा लोंढा दिसला नाही. परिणामी शहरात प्रथम संचारबंदी लागल्यासारखी शांतता निर्माण झाली होती. अनेक व्यापार्‍यांनी दुपारपासून दुकाने उघडण्यास सुरूवात केली. सकाळी ग्राहकाविना बाजार भरला होता, नेहमी दवाखान्यात नेहमीची गर्दी नव्हती, लग्नसराई असूनही मार्केट थंड होते. परिणामी शहरातील सुनेसुने दिसणारे रस्ते निकाल जसजसा लागत गेला तसतसे फुलत गेले. प्रथमच शहरात विराण शांततेचे वातावरण पहावयास मिळाल्याचे अनेकांनी सांगितले. दवाखाने ओस कोणत्याही ऋतूत हमखास गर्दीने गजबजलेले असणारे दवाखाने शुक्रवारी ओस पडल्यासारखे दिसून आले. खासगी दवाखान्यांबरोबरच जिल्हा सामान्य रूग्णालयातदेखील डॉक्टरांना रूग्णांची वाट पहावी लागली. निकालासाठी उपचाराचा कालावधी लांबविल्याने पहिल्यांदाच दवाखाने गर्दीविना शांत होते. मार्केट थंड लग्नसराईचे दिवस असतानाही शुक्रवारी बाजारावर निवडणुक निकालाचा परिणाम जाणवला. लग्नामुळे नेहमी दिसणारी सराफा बाजार, कापड दुकानांवरची गर्दी दिसून आली नाही. उन्हाळ्यात प्रथमच दुकानांवरील व्यापारी आणि कामगारांना निकालाच्या योगाने विश्रांती मिळाली. दुपारपर्यंत बहुतांश निकाल हाती आले तरी बाजारात उलाढाल झाली नाही. भाजी बाजारात शुकशुकाट हिंगोलीत सकाळी पहिल्यांदा कामाला लागणारे भाजी बाजारातील विक्रेते नेहमीप्रमाणे पहाटपासून गाडे थाटून बसले होते; परंतु सकाळपासून हॉटेल्सचालक आणि नागरिकांनी पाठ फिरविल्याने बाजारात शुकशुकाट पसरला होता. सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात होणारी खरेदी शुक्रवारी झाली नाही. परिणामी दिवसभर भाजीपाला विक्रेते हातावर हात धरून बसले होते. रस्तेही सुनेसुने कामानिमित्त ग्रामीण भागातून शहराकडे येणार्‍या लोकांनी शुक्रवारची कामे पुढे ढकलली होती. आजची कामे उद्यावर लोटल्याने ग्रामीण भागातून शहरात लोंढा आलाच नाही. परिणामी नेहमी रस्त्यावर दिसणारी खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहनेही दिसून आली नाहीत. व्यापारी प्रतिष्ठाणांसमोर लागलेल्या वाहनांच्या रांगा दृष्टीस पडल्या नाहीत. परिणामी शहरातील रस्ते सुनेसुने झाले होते. ट्रॅफिक पोलिसांऐवजी बंदूकधारी जवान रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरातील रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी उन्हातान्हात दिसणार्‍यां ट्रॅफीक पोलिसांऐवजी शुक्रवारी बंदुुकधारी जवान दिसून आले. महत्वाच्या ठिकाणी, चौकाचौकात, नाक्यानाक्यावर तसेच संवेदनशील ठिकाणांवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस पहारा देत होते. शहरात रात्रीच्यावेळी गस्त घालणारी पोलिसांची गाडी दिवसा पेट्रोलिंग करीत फिरत होती. बसेसना प्रवाशांची प्रतीक्षा लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रेल्वेस्थानक आणि बसस्थानक गजबजलेले राहते. दररोज प्रवाशी गाड्यांच्या प्रतीक्षेत थांबलेले असल्याचे चित्र शुक्रवारी उलटे होते. प्रवाशांअभावी रेल्वेगाड्या रिकाम्या जात होत्या तर बसेस प्रवाशांच्या प्रतिक्षेत दिसून आल्या. रामलीला मैदानावरही शांतता अवैध धंद्यांचे ठिकाण बनत असलेल्या रामलीला मैदानावर शुकशुकाट पहावयास मिळाला. वाहनांचा ताफा, हॉटेल्सवर दिसणारी गर्दी, विविध साहित्यांची खरेदी-विक्री पहावयास मिळाली नाही. दुकाने, हॉटेल्स तसेच इतर दुकाने बहुतांश जणांनी शुक्रवारी उघडलीच नव्हती. निकालानंतर फुटले फटाके निवडणुकीचा निकाल लागताच शहरात फटाके फुटण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडण्यास सुरूवात केली. तोपर्यंत निरव शांतता असलेल्या शहरातील मोकळ्या रस्त्यांवर वाहनांनी एकाएकी गर्दी केली. दिवसभर करफ्यूसारखी असलेली स्थिती निवळत जावून सायंकाळी रस्ते गर्दीने फुलण्यास सुरूवात झाली. त्याआधी नेहमी वर्दळ असलेले शहर पहिल्यांदाच थांबलेले पहावयास मिळाले. निकालाची उत्सुकता तीन जिल्ह्यास लागलेली होती. निकाल जाहीर करण्यात इतर जिल्ह्याच्या मानाने उशीर झाल्याने जिल्हावासियांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. त्याआधी नेहमीप्रमाणे सकाळी उघडणार्‍या बहुतांश दुकानांच्या शटरला कुलूप होते. लहानसहान हॉटेल्स, पानटपर्‍या तर दिवसभर बंद होत्या. निकाल लागण्यास उशीर झाल्याने ग्रामीण भागातून मिरवणुकीसाठी शहरात दाखल होणारे अनेकजण येवू शकले नाहीत. ग्रामीण भागात अनेकांनी आजची कामे उद्यावर लोटल्याने शहरात कामानिमित्त येणार्‍यांची संख्या घटली. परिणामी शहरातील दवाखाने, हॉटेल्स, कापड दुकानांवर गर्दी दिसून आली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुन्न असलेल्या शहरात अचानकच फटाके फुटण्यास सुरूवात झाली. जसजसे फटाके वाजत गेले तसतसे नागरिकांनी घराबाहेर पडण्यास सुरूवात केली. त्यानंतर गल्लीबोळात फटाक्यांचे आवाज घूमू लागल्याने शहर दणाणूून केले. अगदी सकाळपासून शांत असलेल्या शहरात एकाएकी घोळक्यांनी नागरिक चर्चा करताना दिसून आले. नाक्यानाक्यावर, चौकाचौकात, गल्लीबोळात निवडणुकीच्या निकालावर चर्चा रंगू लागल्या. तावातावाने मत मांडताना नागरिक महात्मा गांधी चौक, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नवा मोंढा भागात दिसत होते. तोपर्यंत शहरातील रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, बुलडाणा अर्बन बँकसमोर फटाके वाजून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)