शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

हार्वेस्टर चालकांकडून पिळवणूक

By admin | Updated: March 4, 2015 15:41 IST

सलग /दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे गहू काढणीचे काम मळणीयंत्राद्वारे करण्यासाठी शेतकर्‍यांची धांदल उडाली आहे.

गजानन हमाणे /कडोळीसलग /दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे गहू काढणीचे काम मळणीयंत्राद्वारे करण्यासाठी शेतकर्‍यांची धांदल उडाली आहे. अशा स्थितीत काही शेतकरी गहू काढणी लवकर उरकण्यासाठी कंबाईन हार्वेस्टर यंत्राचा वापर करीत आहेत. मात्र हार्वेस्टरचालक एकरी १६00 ते १७00 रूपये घेऊन एकप्रकारे शेतकर्‍यांची पिळवणूक करीत आहेत.सेनगाव तालुक्यातील कडोळी परिसरात अवकाळीने बहुतांश पिके वाया गेली आहे. ज्यांची पिके पावसाच्या तडाख्यातून वाचली ते शेतकरी गव्हाची काढणी करण्यासाठी घाईगडबड करीत आहेत. या कामासाठी मजूर मिळणे अवघड झाल्याने मागेल तेवढी मजुरी देण्याची तयारी शेतकरी दाखवत आहेत. तसेच मळणीयंत्रचालकांनीही आपले भाव वाढवले आहेत. मजूर व मळणीयंत्र चालकांकडून एकप्रकारे गरीब शेतकर्‍यांची अडवणूक होत असल्याचे चित्र आहे. तरीही गहू पिकाचे जास्त नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी ओलाच गहू कंबाईन हार्वेस्टरद्वारे काढून टाकत आहेत. पंजाब राज्यातून आलेले हार्वेस्टर चालक पुर्वी गहू कापणी व काढणीच्या कामासाठी एकरी १२00 रूपये घेत असत. आता शेतकर्‍यांची गरज असल्याने त्यांनीही दर वाढवले असून एकरी १६00 ते १७00 रूपये दर केले आहेत.मजुरांची उपलब्धता कमी तसेच कापणी व मळणीवरील होणारा खर्च लक्षात घेता अलीकडच्या काळात शेतकर्‍यांचा कल कंबाईन हार्वेस्टरने गव्हाची कापणी करण्याकडे वाढला आहे. या मशीनने गव्हाची कापणी व मळणी एकाच वेळी होते. त्याचप्रमाणे यासाठी वेळही कमी लागतो. ही बाब ध्यानात घेऊन कडोळी परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी पाऊस व गारपिटीच्या भीतीने कमी वेळामध्ये गव्हाचे पीक काढण्यासाठी हार्वेस्टर वापरण्यास सुरूवात केली आहे. मात्र त्यासाठी जादा दर आकारला जात असून नाईलाजाने शेतकर्‍यांना तो द्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.