शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या मागणीसाठी संपूर्ण वाडी धडकली जिल्हा कचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2017 15:09 IST

पेडगाववाडी येथील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने ग्रामस्थ घराला कुलूप लावून मुला-बाळांसह जिल्हा कचेरीवर धडकले.

 ऑनलाइन लोकमत

हिंगोली, दि. 25 -  पेडगाववाडी येथील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने ग्रामस्थ घराला कुलूप लावून मुला-बाळांसह जिल्हा कचेरीवर धडकले.
 
पेडगाववाडी ही गेल्या अनेक वर्षांपासूनची पेडगावपासून दीड किमी अंतरावरील वस्ती आहे.  त्यांना चारही बाजूने रस्ता नाही. दहा फुटांचा एक पारंपरिक रस्ता होता. तोही खस्ता हाल होता. येथील मुले बाहेरगावी शिक्षणासाठी आहेत. त्यांना एक किमी अंतर पायी जावून चिखल तुडवत मुख्य रस्ता गाठावा लागतो. 
 
याहीपेक्षा जास्त हाल तर बाळंतिणीचे होतात. त्यांना बाजेवर टाकूनच न्यावे लागते. त्यातच दोन महिन्यांपूर्वी असलेला रस्ताही संबंधित शेतक-यांनी ताब्यात घेतला आहे. त्यानंतर तहसील, जिल्हा कचेरीला निवेदने दिली. रस्ता देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र पुन्हा हा रस्ता नांगरुन टाकण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
 
त्यामुळे अख्खी पेडगाववाडी जिल्हा कचेरीवर धडकली आहे. महिला, पुरुष, लहान मुले, वृद्ध असे सर्वांनाच घेवून ही मंडळी आली होती. आमचा रस्त्याचा प्रश्न सोडवा, अशी मागणी या मंडळीने केली आहे. आजोबा-पणजोबाच्या काळापासून रस्ता होता. आताच तो अडवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 
 
नोंद नाही, प्रस्तावित मात्र आहे
शासन दरबारी या गावासह रस्त्याचीही नोंद नाही. नवीन विकास आराखड्यात बासंबा-सिरसम रस्ता तेथून जाणार आहे. मात्र तो होईल कधी, याची शाश्वती नाही. त्यामुळे ५३५ एवढी लोकसंख्या असलेल्या या गावातील लोकांसमोर गंभीर पेच निर्माण झाला आहे.