शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
4
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
5
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
6
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
7
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
8
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
9
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
10
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
11
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
12
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
13
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
14
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
15
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
16
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
17
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
18
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
19
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
20
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

लसीकरणात तरुणांपेक्षाही ज्येष्ठांमध्ये उत्साह जास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST

हिंगोली : केंद्र शासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे लस घेण्यासाठी अजूनही अपेक्षित प्रतिसाद नाही. यात सर्वाधिक १८ ...

हिंगोली : केंद्र शासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे लस घेण्यासाठी अजूनही अपेक्षित प्रतिसाद नाही. यात सर्वाधिक १८ हजार ४९७ ज्येष्ठांसह आरोग्य विभागातील ८५८७ कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले आहे. त्यामुळे तरुणांपेक्षाही ज्येष्ठांमध्येच जास्त उत्साह दिसत आहे.

कोरोनाचा हिंगोली जिल्ह्यात उद्रेक झाला आहे. भविष्यात कोरोना झाला तरीही तीव्र त्रास होऊ नये, यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र त्याकडेही अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. ४५ वर्षांवरील व ६० वर्षांवरील नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मात्र अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध असूनही ती घेण्यासाठी कुणीच समोर येत नसल्याने मनुष्यबळ दिवसभर नुसतेच बसून राहात असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणीच या लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य विभागाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. यासाठी शहरी व ग्रामीण भागात अधूनमधून ध्वनिक्षेपकाद्वारेही आवाहन केले जात आहे. मात्र लसीकरणाचा वेग तरीही तेवढा वाढला नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक लसीकरण

हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयातील केंद्रात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. ६७०० जणांना या ठिकाणी लस देण्यात आली आहे.

कळमनुरी येथे २५२०, औंढा येथे १५२७, वसमत येथे २८५०, सेनगाव १२०३ असे तालुका स्तरावरील केंद्रात लसीकरण झाले आहे.

ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पोत्रा, हट्टा, गोरेगाव, कवठा अशा मोजक्याच ठिकाणी हजारावर लसीकरण झाले. तेही साडेबाराशेच्या पुढे गेले नाही.

ग्रामीण भागातही वाढतोय उत्साह

मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात कोरोना लस घेण्यासाठी नागरिक पुढे येताना दिसत आहेत. त्यातच काही प्राथमिक आरोग्य केंद्रांनी तर नागरिकांच्या सोयीसाठी उपकेंद्रापर्यंत लस पोहोचविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे आता या कामाला गती मिळेल, असे वाटत आहे.

काही दिवसांपूर्वी लसीमुळे काही होणार तर नाही, अशी भीती नागरिकांमध्ये दिसत होती. मात्र जसजसे लसीकरण वाढत चालले तशी ही भीती दूर होत असल्याने यापुढे लसीकरणाचा वेग वाढेल, अशी आशा आरोग्य विभागाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात ३८ हजार २८१ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. अशांना या लसीमुळे कोणताही त्रास झाला नाही. लस घेतलेल्यांना भविष्यात कोरोना संसर्ग झाल्यास त्याची तीव्रता तेवढी राहणार नाही. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या निकषातील वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन डाॅ. पी.एस. ठोंबरे यांनी केले आहे.

लसीकरण केंद्र ३२

हेल्थ केअर वर्कर ८५८७

फ्रंटलाइन वर्कर ५४३५

ज्येष्ठ नागरिक १८,४९७

४५ वयापेक्षा जास्त ६२०१

पहिला डोस घेतलेले एकूण ३८,२८१

दुसरा डाेस घेतलेले एकूण ४५१४