शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अकरा जिल्ह्यात वीजबिल दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:09 IST

महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या ११ जिल्हयात थकबाकी शून्य मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेत वीजबिल थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरणने वीज बिलांच्या दुरूस्तीसाठी मार्च २०१८ पर्यंत महावितरण शाखा व उपविभागीय कार्यालयात वीज ग्राहकांनी तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या ११ जिल्हयात थकबाकी शून्य मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेत वीजबिल थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरणने वीज बिलांच्या दुरूस्तीसाठी मार्च २०१८ पर्यंत महावितरण शाखा व उपविभागीय कार्यालयात वीज ग्राहकांनी तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले आहे.महावितरणकडून जिल्हाभरात थकीत घरगुती विजबिल वसूली व वीजबिल दुरूस्ती मोहिम राबविली जात आहे. घरगुती, औद्योगिक व व्यावसायीक विद्युत ग्राहकांकडील थकित वीजबिल वसूलीसाठी कंबर कसली असून वीजबिलातील दुरूस्तीचे आवाहन करण्यात आले.महावितरण औंरगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळात घरगुती, व्यापारी, औद्योगिक, उच्चदाब ग्राहक, कृषीपंप ग्राहक, थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई राबविण्यात येत आहे. यात ग्राहकांच्या वीजबिला संबंधी तक्रारी असल्यास दुरूस्तीसाठी महावितरणकडून सर्व शाखा व उपविभागीय कार्यालयात ग्राहकांकडून वीज बिलासंबंधी तक्रारी कार्यालयीन वेळेत स्वीकारल्या जात आहेत. शिवाय तक्रारींची दखल घेत बिलात दुरूस्ती केली जात आहे. जास्तीत जास्त ज्या कोणी वीजग्राहकांच्या अशा तक्रारी असतील त्यांनी याबाबत माहिती सादर करावी. अन्यथा ऐनवेळी थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करतांना वीज बिलासंबंधी असणाºया तक्रारींची कोणतीही सबब ऐकून घेण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.तक्रारींची तात्काळ शहानिशा करून वीज बिल दुरूस्ती करण्यात येत आहेत. वीज ग्राहकांच्या बिलासंबंधी तक्रारी असतील. अशा ग्राहकांनी वीज बिलाची सत्यप्रत व तक्रार अर्ज महावितरणच्या जवळच्या कार्यालयात दाखल करावे.जुन्या वीज बिलांच्या तक्रारी माहे मार्च २०१८ पर्यंतच जवळच्या महावितरण कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर येणाºया तक्रारींची दखल घेण्यात येणार नाही.