शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के; भीतीने नागरिक आले घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 09:15 IST

वसमत औंढा व कळमनुरी या तीन तालुक्‍यांच्या सीमेवर मागील तीन वर्षांपासून भूगर्भात आवाज येऊन हे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

हिंगोली:  जिल्ह्यातील नांदापूर व कुरुंदा परिसरात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाचे धक्के यावेळी हिंगोली शहरापर्यंत जाणवले. तसेच नांदेड येथेही हा धक्का जाणवला. वसमत औंढा व कळमनुरी या तीन तालुक्‍यांच्या सीमेवर मागील तीन वर्षांपासून भूगर्भात आवाज येऊन हे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मात्र रविवारी सकाळी ८  वाजून ३३ मिनिटांनी बसलेला धक्का आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का होता. कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, पोत्रा, वारंगा फाटा, दांडेगाव, जवळा पांचाळ, वडगाव, रेडगाव या परिसरात हे धक्के जाणवले. सांडस परिसरातही दोनदा आवाज झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भूगर्भातून मेघगर्जनेसारखा आवाजही आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

वसमत शहरासह तालुक्यातील पांगरा शिंदे, कवठा, कुरुंदा, बोराळा, खुदनापूर, किनोळा, बोरगाव या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. याबाबत तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लातूर येथील भूकंप मापक केंद्राशी संपर्क साधला असल्याचे सांगितले. या भूकंपामुळे अजून नुकसानाची नोंद नसून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले. औंढा तालुक्यातील येळेगाव सोळुंके आणि इतर गावांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत यावेळी पहिल्यांदाच हिंगोली शहरात धक्का जाणवल्याने अनेक जन याबाबत फोनवर विचारना करताना दिसत होते. तसेच नांदेड च्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

टॅग्स :EarthquakeभूकंपHingoliहिंगोली