शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

'मरताना खर बोलतात;माझ्यावर बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा द्या,म्हणजे कोणी अस वागणार नाही' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 15:59 IST

बलात्कारानंतर नराधमांच्या ब्लॅकमेलिंगमुळे विवाहितेची आत्महत्या

ठळक मुद्देसुसाईड नोटमधून झाला आत्महत्येचा उलगडाआत्महत्येपूर्वी विवाहितेवर बलात्कार झाल्याचं सुसाईड नोटमधून समोर आले

सेनगाव :  तालुक्यातील साखरा येथील एका २८ वर्षीय विवाहित महिलेने गुरुवारी दुपारी स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या आत्महत्येचे कारण आता पुढे आले असून सामुहिक बलात्कारानंतर नराधम ब्लॅकमेल करत असल्याने तिने टोकाचे पाऊल उचले असल्याचे मृत्यूपूर्वीच्या सुसाईड नोट मधून पुढे आले आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील साखरा येथील एका २८ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.१३)  राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी तपासात पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोट आढळून आली. यानुसार, महिला २२ डिसेंबर २०१५ रोजी घरात लहान मुलीसोबत असताना चंद्रभान गणपत कायंदे, प्रमेश्‍वर नारायण वावरे, सुरेश नामदेव कायंदे तिघांनी तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडीओ तयार केला होता. हा व्हिडीओ गावातील लोकांना दाखवत व महिलेस ब्लॅकमेल करत असत. या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे महिलेने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. त्या तिघांची चौकशी करून त्यांना सजा द्यावी. मरताना माणुस खरे बोलतो तसे मी खरे बोलत आहे. मी माझ्या मनानेच फाशी घेत असून त्या तिघांना सजा व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यांना शिक्षा झाल्यानंतर पुन्हा गावात कोणी गैरकृत्य करणार नाही असेही नोटमध्ये महिलेने नमूद केले आहे.

पोलिसांनी नोट जप्त केली असून चंद्रभान गणपत कायंदे, प्रमेश्‍वर नारायण वावरे, सुरेश नामदेव कायंदे ( रा.साखरा ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, यापूर्वी मयत महिलेचे  बलात्काराचे प्रकरण सेनगाव पोलीस स्थानकात दाखल होते. मात्र या प्रकरणाकडे पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्याने महिला दुर्देवी आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर हे करत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारSuicideआत्महत्याHingoliहिंगोलीWomenमहिला