शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी काळात परगावांतून येणारे नागरिक वाढले, टेस्ट तेवढ्याच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 17:25 IST

टाळेबंदीच्या काळात जिल्ह्यात नागरिक जशी काळजी घेत होते, तशी आता घेतली जात नसल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देसणासुदीत टाळली चाचणी परतीच्या प्रवासातही तीच बोंब कायम

हिंगोली : जिल्ह्यात दिवाळीच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने इतर जिल्ह्यातून परतले. मात्र या काळात कोरोनाचा कहर कमी झाला होता. त्यामुळे परजिल्ह्यातून आलेल्यांनी चाचणी करून घरी परतणे अपेक्षित असताना तसे काहीच झालेले दिसले नाही. त्याचा परिणाम म्हणून नोव्हेंबर महिन्यातही नियमितएवढ्याच चाचण्या झाल्याचे आढळून आले.

हिंगोली जिल्ह्यात आता कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. टाळेबंदीच्या काळात जिल्ह्यात नागरिक जशी काळजी घेत होते, तशी आता घेतली जात नसल्याचे दिसत आहे. टाळेबंदीच्या काळात परजिल्ह्यातून आलेल्या प्रत्येकाला कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक बनले होते. दिवाळीला मात्र मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावी हा सण साजरा करण्यासाठी परतले होते. त्यात अनेक जण पुणे, मुंबई यासारख्या महानगरातून आलेले आहेत. या ठिकाणी पूर्वीही कोरोनाचा मोठा उद्रेक होता. तर आता त्यात घट झाली तरीही कोरोनाची रुग्णसंख्या त्या मानाने बरीच आहे. त्यामुळे या भागातून येणाऱ्यांनी काळजी म्हणून तरी चाचणी करून घेणे अपेक्षित होते. मात्र तसे होताना दिसत नव्हते. त्यातच नियमितपणेही कोरोनासदृश्य लक्षणे असताना अनेक जण दिवाळीचा सण तोंडावर असल्याने ही चाचणी टाळताना दिसत होते. आता दिवाळी संपल्याने पुन्हा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात आजारी पडल्याचे समजून अनेकजण जातानाही कोरोना चाचणी टाळणार असल्याचेच दिसत आहे. एरवी रेल्वे व बसेसला गर्दी दिसत नव्हती. आता ती दिसत आहे. मात्र हा प्रवास कोणतीही चाचणी न करताच सुरू असून कोरोनाबाबतचे गांभीर्य संपत चालले आहे.

कोविड ओपीडीमध्ये टेस्टींगसाठी प्रतिसाद नाहीदिवाळीच्या काळात गावाकडे परतलेल्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय अथवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची अँटीजन चाचणी अथवा आरटीपीसीआर चाचणी करून घेतली नाही.n जिल्हा व तालुका स्तरावर असलेल्या या यंत्रणांच्या ठिकाणी कोणतीच गर्दी दिसत नव्हती. एवढेच काय तर आरोग्य विभागानेही या दृष्टिकोनातून काही नियोजन केले नव्हते. ज्यांना लक्षणे वाटत होती, अशांनी केलेल्या चाचण्या तेवढ्या झाल्या.

सध्या आपल्याकडे आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा झाली. त्यामुळे चाचण्या वाढल्या. अँटीजनही केली जाते.- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकीत्सक 

टॅग्स :Hingoliहिंगोलीcorona virusकोरोना वायरस बातम्या