शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 30, 2014 00:02 IST

मारोती घ्यार, भांडेगाव उशिराने का होईना, पण शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु पावसाचे आगमन झाले नसल्याने ते वाळून गेल्याने दुबार पेरणीवरही टांगती तलवार दिसत आहे.

मारोती घ्यार, भांडेगावउशिराने का होईना, पण शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु पावसाचे आगमन झाले नसल्याने ते वाळून गेल्याने दुबार पेरणीवरही टांगती तलवार दिसत आहे. भांडेगाव परिसरात हे चित्र निर्माण झाले आहे.हिंगोली तालुक्यातील भांडेगाव, साटंबा, जामठी परिसरात पंधरा दिवसांपूर्वी हलक्या पावसावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या होत्या. परंतु पावसाने उघडीप दिल्यामुळे काही शेतकऱ्यांची पिके वाळली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे़ दोन वर्षांपासून शेतकरी निसर्गाच्या कचाट्यामध्ये सापडत आहे. शासनाकडून पीक नुकसानीची भरपाईही चांगल्या प्रकारे मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना आपला व्यवहार कसा करावा? असा प्रश्न पडला आहे़ यंदा खरिप हंगामातील दोन महिने उलटल्यानंतर पावसाने हलक्या स्वरुपात हजेरी लावली़ भीज पावसावर भांडेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच खरिपाची पेरणी केली़; परंतु त्यानंतर पावसाने उघडीप दिली़ त्यामुळे सोयाबीन, कापूस आदी पिके पाण्याविना सुकू लागली आहेत़ उसनवारी करून महागडे बी-बियाणे, खत वाया जाते की काय? असा प्रश्न कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे़ यावर्षी पावसाचे उशिरा आगमन झाले असून पहिल्याच पावसात काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. बहुतांश ठिकाणी पेरलेले बियाणे निघालेच नाही तर काही पिके पावसाअभावी करपून गेली. जामठी, भांडेगाव, साटंबा शिवारात वैजनाथ डोरले, शंकर भवर, देविदास जगताप, आनंदा घ्यार, ज्ञानेश्वर भवर, रघुनाथ घ्यार, जयाजी घ्यार, राम घ्यार, प्रभू घ्यार यांच्या शेतात पेरलेले बियाणे पाण्याअभावी उगवलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. आता झालेल्या पावसाने मोठ्या आशेपोटी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती; परंतु या पेरणीवरही काही शेतातील पिके पुर्णत: वाळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.