शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

युती आणि आघाडीने विधानसभा इच्छुकांचीही होतेय फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 16:57 IST

अनेकांना भविष्यात उमेदवारी मिळाली नाही तर काय? ही चिंता सतावत आहे.

ठळक मुद्देउमेदवारांचा होतोय राजकीय कोंडमारा वारंवार पक्षबदलाने जनतेच्या मनातूनही उतरताहेत नेते

हिंगोली : लोकसभेला झालेली युती व आघाडी आता विधानसभा इच्छुकांचीही परीक्षा पाहणारी ठरत आहे. याचमुळे लोकसभा इच्छुकांचा आकडाही वाढला होता. मात्र अनेकांना भविष्यात उमेदवारी मिळाली नाही तर काय? ही चिंता सतावत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा बिगूल कधीही वाजू शकतो. तरीही हिंगोली लोकसभेत अजून एकाही उमेदवाराची उमेदवारी निश्चित नाही. विद्यमान खा.राजीव सातव यांच्यावर गुजराथ व इतर राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी असल्याने त्यांनी निवडणूक लढायची की नाही, याचा निर्णय श्रेष्ठींवर सोपविला आहे. त्यामुळे मध्यंतरी आ.संतोष टारफे यांनीही चाचपणी केली. तर शिवसेनेतील इच्छुकांची संख्या अजूनही कमी झाली नाही. मात्र अंतिम यादीत आता मोजकीच नावे आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यात आ.जयप्रकाश मुंदडा, आ.नागेश पाटील, आ.हेमंत पाटील यांच्यापैकीच कुणीतरी रणांगणात उडी घेईल, असे दिसते. मात्र काहींनी आगामी विधानसभेचे गणित हुकत असल्यानेच उमेदवारीवर दावा केल्याचे दिसत आहे. त्यात रुपाली पाटील गोरेगावकर, रामेश्वर शिंदे आदींचा समावेश आहे.

लोकसभा तर गेली आता वसमतची जागाही आता सेनेला सुटणार हे लक्षात आल्यानंतर भाजपचे शिवाजी जाधव यांनीही अपक्ष म्हणून चाचपणी केली. इतर पक्षांच्याही संपर्कात असल्याच्या चर्चा होतच असतात. माजी खा.शिवाजी माने व माजी आ.गजानन घुगे यांचीही तीच परिस्थिती आहे. लोकसभा व विधानसभा दोन्हीही हातच्या गेल्या. त्यातच हे दोघेही सेनेच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात होते. मात्र माजी आ.घुगे यांनी मला लोकसभेच्या चाचपणीसंदर्भात मातोश्रीचे बोलावणे आले होते. त्यात पक्षप्रवेशाचा कोणताच विषय नव्हता. आगामी काळातही विधानसभेची जागा ज्यांना मिळेल, त्याचेच काम करणार असल्याचे त्यांचे म्हणने आहे. माने मात्र अजूनही निवडणूक लढण्याच्या गंभीर मानसिकतेत आहेत. ती लढणार कशी? हे आगामी काळच सांगणार आहे.

दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीतून जागा गेली तरीही निवडणूक चाचपणी करणारा कोणी दिसत नाही. हिंगोलीत मागच्या वेळी काँग्रेसकडून लढून पराभूत झालेल्या माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी दावा सोडलेला नसताना राष्ट्रवादीचे आ.रामराव वडकुते मात्र चाचपणी करताना दिसत आहेत. आता ही जागा सोडवून घेणे किती सोपे व किती अवघड हे कळायला मार्ग नाही. मात्र शिवसेना व भाजपइतकी काँग्रेस व राष्ट्रवादीतील गोची झालेल्यांची संख्या नाही.काहींनी हाताने ओढवली परिस्थितीमागच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर पक्षप्रवेश केलेल्या अनेकांना आगामी काळात युती व आघाडी झाल्यास आपले कसे होणार? याची पुसटशी कल्पना येवू नये, हे आश्चर्याचे वाटते. या सर्व प्रकारांची जाणीव असतानाही काहींनी केलेला पक्षप्रवेश आता अंगलट आल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाHingoliहिंगोली