शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

पंतप्रधान रोजगार योजनेचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:27 IST

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना एकत्रित ...

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना एकत्रित करुन पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) १५ ऑगस्ट २००८ पासून सुरु केली. पंतप्रधान रोजगार योजनेचे जिल्ह्याला ६५ लाभार्थिंना रोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट दिले होते. यात जिल्हा उद्योग केंद्र ४५ व खादी ग्रामोद्योग महामंडळ २० लाभार्थीचा समावेश आहे. जिल्हा उद्योग केंद्राने ९२ (१९४.२६ लाख) व खादी ग्रामोद्योग महामंडळाने ११० (२६३.४६ लाख) असे २०२ प्रस्ताव जिल्ह्यातील १६ बँकांकडे मंजुरीसाठी पाठविले. परंतु जिल्ह्यातील बँकांनी जिल्हा उद्योगचे ३७ (४४ लाख १५ हजार) व खादी ग्रामोद्योगचे १४ (४१ लाख ५१ हजार) चे ५१ प्रस्तावच मंजूर केले आहेत.

मंजूर केलेल्या ५१ प्रस्तावांपैकी जिल्हा उद्योग केंद्राने १६ (३२ लाख ६ हजार) व खादी ग्रामोद्योग महामंडळाने ८ (१६ लाख ९४ हजार) असे २४ लाभार्थिना वाटप केले. बँकांकडे पाठविलेल्या २०२ प्रस्तावांपैकी बँकांनी जिल्हा उद्योग केंद्राचे २५ (७६ लाख) व खादी ग्रामोद्योगचे ३६ (८३ लाख २४ हजार) असे ६१ प्रस्ताव परत केले. जिल्ह्यातील बँकांकडे जिल्हा उद्योगचे ४० (७६ लाख १६ हजार) व खादी ग्रामोद्योगचे ६५ (१४७.३५) असे ५६ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

जिल्ह्यातील अलाहाबाद बँक, ॲक्सीस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडीया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडीया, सिंडीकेट बँक, युनीयन बँक आदी १६ बँकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. परंतु, काही मोजक्याच बँकांनी पाठविलेले प्रस्ताव मंजूर केले आहेत.

केंद्र व राज्य शासन बेरोजगारांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवित आहे. पण बँका मात्र आपला हेकेखोरपणा कायम ठेवण्यात माहिर आहेत, हे प्रस्ताव मंजूर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातंगर्गत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी २०२०-२१ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दर तीन महिन्याला होणाऱ्या बैठकीत आढावाही घेतला होता. बँकांना प्रत्येक बैठकीत सूचनाही दिल्या होत्या. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस.ए. कादरी, खादी ग्रामोद्योगचे प्रभारी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बी.एम. राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक गोपाल पवार यांनी प्रयत्न केले.

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत योजनेचा जिल्ह्यातील युवकांनी लाभ घ्यावा. योजनेसंदर्भात काही आडचणी आल्यास जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग महामंडळाशी संपर्क साधावा.

-एस.ए.कादरी, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र हिंगोली