जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी वारंवार येत असलेल्या अडचणीमुळे लांबलेली बैठक ९ जुलै रोजी होणार आहे. या बैठकीत गतवर्षीच्या कामांचा आढावा तसेच नवीन वर्षातील केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी मिळूनही काही विभागांनी कामे करण्यास दिरंगाई केल्यामुळे निधी वाया जाण्याची भीती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा प्रकार घडण्याची शक्यता आहे, याचा आढावा या बैठकीत होईल, असे दिसते. शिवाय मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील काही प्रश्न प्रलंबित असून त्यावर सदस्य या बैठकीत आवाज उठवतील, असे दिसत आहे. पीक कर्ज, पांदण रस्ते, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे, मुख्यमंत्री ग्रामसडकमध्ये जिल्हा परिषदेच्या आराखड्यात आलेली कामे आदी बाबींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
९ जुलै रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST