शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेगाभरतीसाठी जि.प.त १४७ रिक्त जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:33 IST

राज्यात मेगाभरती होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्या-त्या संस्थांतील रिक्त पदांची माहिती मागविली आहे. मात्र आगामी काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने ही भरती प्रक्रिया होईल की नाही, याचीच शंका दिसून येत आहे. शिवाय हिंगोलीत जि.प. व जिल्हाधिकारी कार्यालय या दोन मोठ्या संस्थांमध्ये केवळ १७५ जागा भरल्या जाण्याची शक्यता असल्याने यापूर्वीच्या आ

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यात मेगाभरती होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्या-त्या संस्थांतील रिक्त पदांची माहिती मागविली आहे. मात्र आगामी काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने ही भरती प्रक्रिया होईल की नाही, याचीच शंका दिसून येत आहे. शिवाय हिंगोलीत जि.प. व जिल्हाधिकारी कार्यालय या दोन मोठ्या संस्थांमध्ये केवळ १७५ जागा भरल्या जाण्याची शक्यता असल्याने यापूर्वीच्या आकड्यांचे काही खरे दिसत नाही.शासनाने यापूर्वी जिल्हा परिषदांना भरती प्रक्रिया राबविण्यासाठी वेळापत्रक आखून दिले होते. कोणत्याही परिस्थितीत त्यात बदल करू नये, असेही सांगितले होते. मात्र जागा भरण्यावर निर्बंध घातल्याने एक ते दोन जागांची भरती व्हायची. त्यासाठी येणाऱ्या हजारो अर्जांमुळे प्रशासनाची दमछाक व्हायची. आता राज्यात एकत्रित भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगितले जाते. यासाठी जिल्हा परिषदेने तर रिक्त पदांचा अहवालही दिला आहे. एकूण १८२ जागा रिक्त असल्या तरीही अनुकंपासाठी राखीव ठेवलेल्या ३१ जागा यातून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण १४७ जागा रिक्त राहात आहेत. यात आरोग्य सेवक महिला-९0, आरोग्य सेवक पुरूश-२७, ग्रामसेवक ६, पशुधन पर्यवेक्षक २, अंगणवाडी पर्यवेक्षिका-३, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ५, औषध निर्माण अधिकारी-४, कनिष्ठ अभियंता १0 अशा रिक्त जागा आहेत. याला पूर्णपणे मंजुरी मिळाली तर एवढ्या जागा निघण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात तर तलाठ्यांच्याच जास्त जागा असून एकूण २५ जागा रिक्त असल्याने ते भरल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेगा भरतीत या दोन प्रमुख संस्थांमध्ये तांत्रिक पदे वगळता इतर पदांची संख्या नसल्यातच जमा आहे. त्यामुळे ही भरती केवळ तांत्रिक पदांसाठीच होणार की काय? असे चित्र दिसत आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया होणे शक्य दिसत नसून तयारी करणाºयांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.हिंगोली जिल्ह्यातच नव्हे, तर सगळीकडेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकडे युवकांचा कल वाढला आहे. मेगा भरतीच्या आशेने अनेकजण क्लासेसलाही जात आहेत. मात्र होणाºया भरतीत तांत्रिक पदांचीच संख्या जास्त असल्याचे हिंगोली जिल्ह्यात तरी दिसत आहे. त्यामुळे उर्वरित पदांसाठी मोठी चुरस राहणार आहे. त्यातच शासनाने शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठीही अटींमध्ये शिथिलता प्रदान केली आहे. त्यात केवळ टीईटी उत्तीर्णतेचा प्रश्न राहणार आहे. मात्र सर्वच पदे राज्यात एकाच दिवशी परीक्षा घेवून केंद्रिय पद्धतीने भरली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद