शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनांनी दणाणली जिल्हा कचेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:13 IST

विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा कचेरीसमोर १७ डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांनी अर्धनग्न अवस्थेत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा कचेरीसमोर १७ डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांनी अर्धनग्न अवस्थेत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर ग्रामरोजगार सेवक संघटनेने एकदिवशीय धरणे आंदोलन केले. औंढा येथे नवीन दारू दुकाने स्थलांतरित करण्यास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. विविध आंदोलनांनी सोमवारी शहर दणाणून गेले होते.बेरोजगार दिव्यांगाच्या विविध मागण्यांची पुर्तता करावी, अन्यथा भिकमांगो आंदोलन केले जाईल. या संदर्भाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना जिल्हा कर्णबधीर असोसिएशन संघटनेच्या वतीने दिले होते. शिवाय १६ डिसेंबर पर्यंत दिव्यांगाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे दिला होता. परंतु याबाबत दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हाभरातील दिव्यांगांनी जिल्हा कचेरीसमोर अर्धनग्न होऊन भीक-मांगो आंदोलन करत शासनविरोधी घोषणा दिल्या. यावेळी जिल्हाभरातील बेरोजगार दिव्यांग सोमवारी हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित जमले होते.ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय धरणे आंदोलनहिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १७ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामरोजगार सेवकास शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे. तसेच इतर राज्याप्रमाणे महाराष्टÑ राज्यातही ग्रामरोजगार सेवकास अठरा हजार रूपये वेतन द्यावे. तसेच हे वेतन त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करावे. राष्टÑीय रोजगार हमी योजनेची स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात यावी. यासह विविध मागण्यां आहेत. परंतु मागण्यांच्या पूर्ततेकडे शासनाचे दुर्लक्ष असून वारंवार पाठपुरावा करूनही या विषयाचे गांभीर्य घेतले जात नाही. त्यामुळे जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सदर मागण्या मान्य न केल्यास २४ डिसेंबर रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला.जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांनी दिले निवेदनऔंढा नागनाथ नगर पंचायत हद्दीतमध्ये नवीन देशी दारूचे दुकान, बीअर बार व वाईन शॉपला शासनाने मंजूरी देऊ नये, या मागणीसाठी ग्रामस्थ हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. यापूर्वीही पोलीस प्रशासन व संबधित विभागाकडे निवेदने नागरिकांनी सादर केली आहेत. औंढा नागनाथ येथे शिवशंकराचे ज्योतिर्लिग असून या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. धार्मिक जागतिक स्थळ असल्याने नवीन दारू दुकाने स्थलांतरित करण्यास परवाना देण्यात येऊ नये, तसेच स्थानिक प्रशासनासही नवीन परमिट रूम व बीअर शॉपीला मंजुरी देण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांनी केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने पुरूष, महिलांची उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा