शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
4
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
6
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
7
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
8
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
9
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
10
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
11
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
12
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
13
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
14
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
15
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
16
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
17
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
18
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
19
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
20
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."

जिल्हा मध्यवर्ती बँकेत गर्दी कमी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST

कळमनुरी : शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत मागील ६ ते ७ महिन्यापासून ग्राहकांची गर्दी कमी होत नाही. दररोज ...

कळमनुरी : शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत मागील ६ ते ७ महिन्यापासून ग्राहकांची गर्दी कमी होत नाही. दररोज येत हे बँकेत ग्राहकांची गर्दी वाढत चालली आहे. ग्राहकांची गर्दी कमी होत नसल्याने बँकेच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम होत आहे.

येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे नऊ हजार ग्राहक आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दर दोन ते तीन महिन्याला प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. तसेच निराधारांचे अनुदान ,दुष्काळी अनुदान, आदी अनुदान याच बँकेकडून वाटप केल्या जाते. दररोज बँकेत येणाऱ्या ग्राहकांची गर्दी वाढली आहे. सकाळपासून - संध्याकाळपर्यंत बँकेत ग्राहकांची गर्दी कमी होताना दिसून येत नाही. दुष्काळी अनुदान ४९ गावातील शेतकऱ्यांसाठी आलेले आहे. दर दिवशी दोन ते तीन गावांना या बँकेतून दुष्काळी अनुदान वाटप केले जाते. या बँकेत दुष्काळी अनुदान वितरित करण्यासाठी ८ कोटी ८ लाख १८ हजार रुपये आले होते. १६ हजार ९९८ शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करायची होती. आतापर्यंत ३८ गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे वाटप बँकेतून करण्यात आले. दर दिवशी साडेचारशे ते पाचशे ग्राहकांना रक्कम वाटप केल्या जात आहे. ही बँक शेतकऱ्यांची बँक असल्यामुळे शेतकरी लाभार्थ्यांची गर्दी जास्त असते. या बँकेला ग्राहक सेवा केंद्र नसल्यामुळे बँके वरच ग्राहकांचा जादा बोजा पडतो. या बँकेत ग्राहकांची संख्या वाढलेली आहे. या बँकेला ग्राहक सेवा केंद्र उघडणे गरजेचे आहे. हे केंद्र उघडल्याशिवाय बँकेची गर्दी कमी होत नाही. ग्राहक सेवा केंद्र उघडण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. ग्राहक सेवा केंद्र उघडल्यास बँकेतील ग्राहकांना याचा चांगला फायदा होणार आहे. मागच्या एप्रिल - मे महिन्यापासून या बँकेत रक्कमा उचलण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. दररोज ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात. दररोज बँकेत ग्राहकांची गर्दी होत असल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यावर कामाचा ताण पडलेला आहे. बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी ग्राहकांच्या वतीने होत आहे. तूटपुंज्या कर्मचाऱ्यांवर बँकेचा डोलारा सुरू आहे. कर्मचारी वर्ग कमी असल्यामुळे ग्राहकांना रक्कमा देण्यासाठी वेळ लागतो. दररोज सकाळी ९ वाजल्यापासून बँकभोवती ग्राहकांची गर्दी जमलेली असते.

या बँकेत शेतकऱ्यांची खाती, निराधार लाभार्थी, पी. एम.किसान, ग्रामपंचायतच्या विविध योजनांची खाती, तसेच अनेक कर्मचारी वर्गांचे खाते या बँकेत असल्यामुळे रकमा उचलण्यासाठी बँकेत नेहमीच गर्दी होत असते. ग्राहकांची गर्दी वाढलेली असल्याने बँकेवर ताण पडलेला आहे. ग्राहकांना रकमा वेळेवर मिळाव्यात, यासाठी शाखाधिकारी वाय. ए. पठाण, संतोष देशमुख, जी. एन. पंचलिंगे, डी.आर. शिंदे, विठ्ठल तडस, विजय देशमुख, श्यामराव हाके आदि प्रयत्न करीत आहेत.