शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बँकेत गर्दी कमी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST

कळमनुरी : शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत मागील ६ ते ७ महिन्यापासून ग्राहकांची गर्दी कमी होत नाही. दररोज ...

कळमनुरी : शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत मागील ६ ते ७ महिन्यापासून ग्राहकांची गर्दी कमी होत नाही. दररोज येत हे बँकेत ग्राहकांची गर्दी वाढत चालली आहे. ग्राहकांची गर्दी कमी होत नसल्याने बँकेच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम होत आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे नऊ हजार ग्राहक आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दर दोन ते तीन महिन्याला प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. तसेच निराधारांचे अनुदान ,दुष्काळी अनुदान, आदी अनुदान याच बँकेकडून वाटप केल्या जाते. दररोज बँकेत येणाऱ्या ग्राहकांची गर्दी वाढली आहे. सकाळपासून - संध्याकाळपर्यंत बँकेत ग्राहकांची गर्दी कमी होताना दिसून येत नाही. दुष्काळी अनुदान ४९ गावातील शेतकऱ्यांसाठी आलेले आहे. दर दिवशी दोन ते तीन गावांना या बँकेतून दुष्काळी अनुदान वाटप केले जाते. या बँकेत दुष्काळी अनुदान वितरित करण्यासाठी ८ कोटी ८ लाख १८ हजार रुपये आले होते. १६ हजार ९९८ शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करायची होती. आतापर्यंत ३८ गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे वाटप बँकेतून करण्यात आले. दर दिवशी साडेचारशे ते पाचशे ग्राहकांना रक्कम वाटप केल्या जात आहे. ही बँक शेतकऱ्यांची बँक असल्यामुळे शेतकरी लाभार्थ्यांची गर्दी जास्त असते. या बँकेला ग्राहक सेवा केंद्र नसल्यामुळे बँके वरच ग्राहकांचा जादा बोजा पडतो.या बँकेत ग्राहकांची संख्या वाढलेली आहे. या बँकेला ग्राहक सेवा केंद्र उघडणे गरजेचे आहे. हे केंद्र उघडल्याशिवाय बँकेची गर्दी कमी होत नाही. ग्राहक सेवा केंद्र उघडण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. ग्राहक सेवा केंद्र उघडल्यास बँकेतील ग्राहकांना याचा चांगला फायदा होणार आहे. मागच्या एप्रिल - मे महिन्यापासून या बँकेत रक्कमा उचलण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. दररोज ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात दररोज बँकेत ग्राहकांची गर्दी होत असल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यावर कामाचा ताण पडलेला आहे. बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी ग्राहकांच्या वतीने होत आहे. तूटपुंज्या कर्मचाऱ्यांवर बँकेचा डोलारा सुरू आहे. कर्मचारी वर्ग कमी असल्यामुळे ग्राहकांना रक्कमा देण्यासाठी वेळ लागतो. दररोज सकाळी ९ वाजल्यापासून बँकभोवती ग्राहकांची गर्दी जमलेली असते. या बँकेत शेतकऱ्यांची खाती, निराधार लाभार्थी, पी. एम.किसान, ग्रामपंचायतच्या विविध योजनांची खाती, तसेच अनेक कर्मचारी वर्गांचे खाते या बँकेत असल्यामुळे रकमा उचलण्यासाठी बँकेत नेहमीच गर्दी होत असते. ग्राहकांची गर्दी वाढलेली असल्याने बँकेवर ताण पडलेला आहे. ग्राहकांना रकमा वेळेवर मिळाव्यात यासाठी शाखाधिकारी वाय ए पठाण, संतोष देशमुख, जी. एन. पंचलिंगे, डी.आर. शिंदे, विठ्ठल तडस, विजय देशमुख, श्यामराव हाके आदि प्रयत्न करीत आहेत.