शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जिल्ह्यात ६0५ बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:22 IST

जिल्ह्यात ग्रामीण भागात कुपोषित १६४ तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या ४४१ एवढी आहे. आता शहरी व ग्रामीण या दोन्ही भागातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करून निकषाप्रमाणे सर्वच कुपोषित बालकांना बालविकास केंद्रांमध्ये दाखल केले जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण भागात कुपोषित १६४ तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या ४४१ एवढी आहे. आता शहरी व ग्रामीण या दोन्ही भागातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करून निकषाप्रमाणे सर्वच कुपोषित बालकांना बालविकास केंद्रांमध्ये दाखल केले जाणार आहे.यापूर्वी कुपोषणमुक्तीसाठी आरोग्य विभागाकडून महिला व बालकल्याण विभागाला निधी दिल्यानंतर एका महिनाभरात या मुलाला पोषण आहार देवून त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असे. मात्र आता त्यात बदल केला आहे. शासनाने थेट या विभागालाच निधी देवू केला. तो आयुक्त स्तरावरून खर्ची पडणार आहे. शहरी असो वा ग्रामीण भागातील ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील सर्वच बालकांच्या दंड घेर, उंची व वजनाची माहिती घेतली जाणार आहे. यासाठी सेविकांमार्फत वैद्यकीय अधिकारी तपासणी करणार आहेत. त्याचबरोबर पर्यवेक्षिकांकडून त्यांची पुन्हा पाहणी केली जाणार आहे. त्यातून वयानुसार कुपोषणात मोडणाºया बालकांना बारा आठवड्यांसाठी बाल विकास केंद्रात ठेवून त्यांना इडीएनएफ अर्थात एनेर्जी डेन्स न्यूट्रिशियस फूड दिले जाणार आहे. ते १00 ग्रामचे पाकिट असून ते बालकांनी खावे यासाठी त्यात गोडवाही असणार आहे.जिल्ह्यातील तीव्र कुपोषित बालकांची प्रकल्पनिहाय संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता सरसकट बालकांची तपासणी होणार आहे. तर त्यात दंडाचा घेर, वजन, उंची व वयाचे निकष काटेकोरपणे पाळले जाणार आहेत. या सर्व प्रकारामुळे तीव्र कुपोषित बालकांचीच खरी संख्या साडेचारशेच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. शिवाय यात अंगणवाडीच्या बाहेरील मुलांचीही तपासणी करायची असल्याने त्या मुलांचीही माहिती आता नव्याने उपलब्ध होणार आहे. सध्या असलेली आकडेवारी ही अंगणवाडीत येणाºया बालकांचीच आहे. त्यामुळेही संख्येत वाढ होणार आहे. तर काही ठिकाणी हे आकडे कमी दाखविले जाण्याची शक्यता असून त्यांनाही आता लपवा-छपवी न करता यात चांगले काम करण्याची संधी आहे.