शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मराठा जातीच्या प्रमाणपत्रांचे राज्यात सर्वप्रथम वितरण

By admin | Updated: July 20, 2014 00:25 IST

हिंगोली : राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण लागू केल्यानंतर या संदर्भातील आदेश १५ जुलै रोजी काढण्यात आले.

हिंगोली : राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण लागू केल्यानंतर या संदर्भातील आदेश १५ जुलै रोजी काढण्यात आले. त्यानंतर शनिवारी हिंगोली येथील तहसील कार्यालयात मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. महाराष्ट्रात सर्वात प्रथम असे प्रमाणपत्र देण्याचा मान हिंगोलीला मिळाला असल्याचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी सांगितले. राज्य शासनाने मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्या अनुषंगाने १५ जुलै रोजी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने या संदर्भातील शासन निर्णय काढला. हा निर्णय प्राप्त होताच १९ जुलै रोजी हिंगोली येथील तहसील कार्यालयात मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानुसार प्रात्यनिधीक स्वरुपात पहिले प्रमाणपत्र सेनागव तालुक्यातील सिनगी खांबा येथील १२ वी उत्तीर्ण झालेल्या शुभदा भारत शिंदे या विद्यार्थिनीस देण्यात आले. त्यानंतर मराठा समाजातील ११ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, मराठा सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी मराठा सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ठोकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, खंडेराव सरनाईक, प्रा. माणिक डोखळे, शिवराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, राजू गोडबान, केशवराव सिरसाठ आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्निल जगताप यांनी केले.प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रेमराठा जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधितांना प्रवेश निर्गम उतारा किंवा टीसी, वडिलांचे/ काकांचे/ आत्या/ आजोबांचे/ पंजोबाचा प्रवेश निर्गम उतारा किंवा टीसी, १३ आॅक्टोबर १९६७ पूर्वीचे वास्तव्य असल्याबाबतचा पुरावा ज्यामध्ये शेती असेल तर खासरा पत्रक किंवा पाहणी पत्रक किंवा वडिल/ आजोबा/ पंजोबा यांचा जन्म- मृत्यू नोंदणीचा उतारा आदी कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी यांनी सांगितले.