शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदारक ! हिंगोलीत दिड महिन्याच्या बालकाचे कुत्र्याने तोडले लचके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 15:58 IST

शहरातील आजम कॉलनीभागात दिड महिन्याच्या बालकाचे पिसळलेल्या कुत्र्याने लचके तोडल्याची घटना आज  सकाळी ११. ३० च्या सुमारास घडली. 

हिंगोली : शहरातील आजम कॉलनीभागात दिड महिन्याच्या बालकाचे पिसळलेल्या कुत्र्याने लचके तोडल्याची घटना आज  सकाळी ११. ३० च्या सुमारास घडली. किसन पारस मोरय्या असे या दिड महिन्याच्या बालकाचे नाव आहे.  

या बाबत अधिक माहिती अशी कि, बालकाला त्याच्या आईने दुध पाजून जमिनीवर अंथरुनावर टाकुन त्या कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तोच पिसाळलेल्या कुत्र्याने घरात प्रवेश करुन थेट बालकावरच झेप घेतली व लचके तोडण्यास सुरुवात केली. बालकाचा जोराने रडण्याचा आवाज आल्याने आईसह परिसरातील नागरिकांनी बालकाडे धाव घेतली. त्यामुळे कुत्र्याने तेथून पळ काढला. 

यानंतर पालकांनी व नागरिकांनी बालकाला तत्काळ जिल्हासामान्य रुग्णालयात हलविण्यासाठी प्रयत्न केले. कुत्र्याने  बालकाच्या डाव्या बाजूचा डोळा व डोक्याला जबर चावा घेतला आहे. यामुळे बालक पूर्णतः रक्तबंबाळ झाले होते. बालकावर डॉ. अजय शिराडकर, डॉ. मोरे यांनी उपचार केले. जखम गंभीर असल्याने बालकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आल्याची माहिती डॉ. इनायत्तुला खान यांनी दिली. 

कामासाठी आलेले आहे मोरय्या कुटूंब मोरय्या कुटूंब हे मुळचे उत्तरप्रदेशातील रहिवाशी आहे. मात्र ते हिंगोलीतच ८ ते ९ वर्षापासून कामानिमित्त दाखल झालेले आहे.  दोघे पती- पत्नी शहरातील एका बेकरीवर कामास आहेत. सदरील घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून या भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी निवेदनाद्वारे पालिकेकडे  करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. 

मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कुत्र्यांचा अद्याप पालिकेच्यावतीने बंदोबस्त केलेला नाही. विशेष म्हणजे रात्री - अपरात्री मोकाट कुत्रे वाहनांचा पाठलाग करत असून, पादचा-यांवरही धावून जात आहेत. कुत्रे एवढे हिसंक बनलेले आहेत ते त्यांना हाकण्याचा प्रयत्न केला तर जास्तच अंगावर धावून येत आहेत. 

कुत्रा पकडण्याचा सुचना दिल्या सुप्रिमकोर्टाच्या आदेशानुसार प्राण्याला हात लावणे तर सोडाच त्याला पकडणेही कठीण झाले आहे. परंतु पिसाळलेला कुत्र्याने चावा घेतला असेल तर त्याला ताब्यात घेऊन मारता येईल. त्यासाठी घटना घडलेल्या परिसरात पालिकेच्या साफाई कामगारांना पाठवून सदरील कुत्रा ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. शिवाय, शहरातील मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त लावण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु असल्याचे न. प. मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Hingoliहिंगोली