शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

विहिरींच्या निधीवर झाली कृषी समितीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:57 IST

जि.प.च्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया विशेष घटक व आदिवासी उपायोजनेतील सिंचन विहिरी योजनेत जवळपास पाच कोटी ७0 लाख रुपये एवढ्या निधीची गरज असून तो न मिळाल्यास जवळपास शंभर ते दीडशे विहिरींची कामे धोक्यात येणार असल्याने यावर चर्चा करण्यात आली. हा निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा, यासाठी पत्रव्यवहार करण्यास सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जि.प.च्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया विशेष घटक व आदिवासी उपायोजनेतील सिंचन विहिरी योजनेत जवळपास पाच कोटी ७0 लाख रुपये एवढ्या निधीची गरज असून तो न मिळाल्यास जवळपास शंभर ते दीडशे विहिरींची कामे धोक्यात येणार असल्याने यावर चर्चा करण्यात आली. हा निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा, यासाठी पत्रव्यवहार करण्यास सांगण्यात आले.कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कृषी समितीच्या बैठकीस सदस्य डॉ.सतीश पाचपुते, फकिरा मुंडे, पं.स. सभापती भीमराव भगत, विलास काठमोडे जिल्हा कृषी विकास अधिकारी डुब्बल यांची उपस्थिती होती. यावेळी डुब्बल यांना विशेष घटक योजनेबाबत विचारणा केली असता त्यांनी सदस्यांसमोर आढावा मांडला. त्यात विशेष घटक योजनेत २0१६-१७ मध्ये ४३४ विहिरींचे काम सुरू केले होते. त्यापैकी ७१ पूर्ण तर ३६३ प्रगतीत आहेत. यापैकी ११६ चे तर यंदाच खोदकाम सुरू झाले आहे. यासाठी ९ कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध झाला आहे. तर आणखी पाच कोटी रुपये लागणार आहेत. तरच ही सर्व कामे पूर्ण होणार आहेत. अन्यथा १00 विहिरींची कामे लटकण्याची भीती आहे. याशिवाय ओटीएसपीमध्ये २३५ विहिरींचे काम सुरू आहे. १.१६ कोटी मिळाले. तर ७0 लाखांची गरज आहे. यातही निधी न मिळाल्यास अडचण आहे. याशिवाय सदस्यांनी बोंडअळी सर्वेक्षणाची अंतिम आकडेवारी कधी मिळेल, अशी विचारणा केली.दरम्यान विशेष घटक योजनेत २0१६-१७ मध्ये १0७ विहिरींचे खोदकाम पूर्ण झाले आहे. त्यावेळी त्यांची देयके पं.स.तून काढावीत, असा नियम होता. मात्र ही कामे करीत असतानाच शासनाचे नवीन कामांसाठी पत्र आले. त्यात जि.प.च्या स्तरावरूनच लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र त्यामुळे पं.स.तून जि.प.कडे निधी परत मागवावा लागणार आहे. याची प्रक्रिया सुरू असतानाच हा जुना निधी असल्याने तो पं.स.कडून वितरित केला तरीही चालेल, अशी काहींची भूमिका होती. यात नेमका तोडगाच निघत नसल्याने मागील काही महिन्यांपासून निधी असूनही तो लाभार्थ्यांच्या पदरी पडत नसल्याचे चित्र आहे. आजच्या विषय समितीतही यावर ठोस निर्णय घेवून लाभर्थ्यांना लाभ मिळावा, असे सांगण्यात आले.जि.प.च्या कृषी समितीच्या बैठकीनंतर जि.प.सदस्य डॉ.सतीश पाचपुते यांनी विशेष घटक व आदिवासी उपयोजनेत शेतकºयांना पूर्णपणे लाभ मिळण्यासाठी आणखी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. विशेष घटकमध्ये ४३४ लाभार्थ्यांसाठी १४.३९ कोटींची गरज आहे. यापैकी ९ कोटी मिळाले आहेत. आणखी ५ कोटी दिल्याशिवाय ही कामे पूर्ण करणे शक्य नाही. त्याचबरोबर आदिवासी उपयोजनेतही जवळपास ७0 लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे एवढा वाढीव निधी देण्याची मागणीही त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.