शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींवरील अविश्वास फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:57 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास शनिवारी दहा विरुद्ध एका मताने फेटाळला. आजी-माजी आमदारांच्या गटाला अविश्वास ठराव पारित होण्यासाठी आवश्यक ११ संचालकाचा आकडा गाठता न आल्याने धक्का बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास शनिवारी दहा विरुद्ध एका मताने फेटाळला. आजी-माजी आमदारांच्या गटाला अविश्वास ठराव पारित होण्यासाठी आवश्यक ११ संचालकाचा आकडा गाठता न आल्याने धक्का बसला आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आ. तान्हाजी मुटकुळे, माजी आ. भाऊ पाटील गोरेगावकर गटाची सत्ता आहे. ९ महिन्यांपूर्वी खांदेपालटामध्ये बाजार समितीची सूत्रे अनपेक्षितपणे काँग्रेसचे डॉ. नीळकंठ गडदे यांच्याकडे गेले होते. असे असताना सत्ताधारी गटात निर्माण झालेल्या दुफळीत गडदे यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या संचालकांनी भाजपच्या संचालकांना सोबत घेवून ९ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. एकूण ११ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. सत्ताधारी गटाच्या संचालकांनी एकत्र येवून अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने हा प्रस्ताव पारित होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. यात सभापती डॉ. गडदे हे एकाकी पडले होते. शनिवारी या प्रस्ताव निर्णय घेण्यासाठी पिठासीन अधिकारी अतुल चोरमारे यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. या सभेला एकूण मतदान पात्र १६ संचालकांपैकी ११ उपस्थित होते. अविश्वास प्रस्तावावरील मतदानात ११ संचालकांनी भाग घेतला.अविश्वास ठरावाच्या बाजूने संचालक संजय देशमुख, द्वारकादास सारडा, शंकर बोरुडे, गोपाळराव देशमुख, गिरधारी तोष्णीवाल, श्रीकांत कोटकर, अमोल हराळ, इंदुताई देशमुख, गोदावरी शिंदे, सुमित्रा नरवाडे आदी १० तर विरोधी बाजूने सभापती डॉ. गडदे यांचे यांचे स्वत:चेच एक मत पडले.अविश्वास ठराव आणणाºया सत्ताधारी गटाचे संचालक संतोष इंगोले यांच्यासह विरोधी गटाचे विनायकराव देशमुख, आयाजी पाटील, दत्तराव टाले, छाया पोले आदी संचालक या बैठकीस गैरहजर राहिले. अविश्वासासाठी आवश्यक असणारी ११ मते मिळाली नसल्याने हा प्रस्ताव चोरमारे यांनी फेटाळला. सत्ताधारी गटाने आपल्याच गटाच्या सभापतीवर आणलेला अविश्वास प्रस्ताव त्यांच्या गटाचा एक संचालक फुटल्याने फेटाळला गेला.बाजार समितीत विरोधकांनी या आयत्या संधीचा फायदा घेत सभापती गडदे यांना आपल्या गटाकडे ओढले. आजी-माजी आमदारांच्या गटाने आणलेला अविश्वास फेटाळला गेल्याने या राजकारणात त्यांना चपराक बसली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी सहाय्यक निबंधक एम.ए. भोसले, सचिव दत्तात्रय वाघ, मंडळ अधिकारी अंकुश पोले यांनी काम पाहिले.बाजार समितीच्या हितासाठी आम्ही अविश्वास प्रस्ताव आणला होता. विरोधकांनी आमचा एक संचालक फोडल्याने अआवश्यक असणारे संख्याबळ जोडता आले नाही. बाजार समितीच्या विकासाकरीता यापुढेही सातत्याने प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया संचालक कांतराव कोटकर यांनी दिली.आमच्या पक्षाच्या संचालकांच्या अवाजवी अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नसल्याने त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. तो फेटाळला गेल्याने मला प्रामाणिकतेची पावती मिळाली. शेतकरी हिताचे निर्णय घेणार असल्याचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांनी सांगितले.या अविश्वास प्रस्तावासाठी आयोजित विशेष बैठकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. मागच्या वेळी सभापती निवडीला झालेल्या गोंधळामुळे ही खबरदारी घेतल्याचे दिसून येत होते.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदPoliticsराजकारण