शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्डावरील मोफत धान्य आपल्याला मिळाले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:20 IST

हिंगोली : अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किले गहू, असे पाच किलो धान्य ...

हिंगोली : अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किले गहू, असे पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या धान्याचे बहुतांश ठिकाणी वाटप होत असले तरी अद्याप काही गावांमध्ये नियमित वाटप होत नसल्याचे आरोप लाभार्थींमधून होत आहेत. त्यामुळे अनेकांना मोफत धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.

कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागू केले होते. त्यामुळे जवळपास सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. पुन्हा निर्बंध शिथिल करण्यात आल्याने बाजारपेठ खुली झाली आहे. तरीदेखील आर्थिक घडी बसण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. कडक निर्बंध काळात अन्नधान्याविना उपासमार होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाकडून मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. या निर्णयामुळे लाभार्थींमधून समाधान व्यक्त केले जात होते. बहुतांश ठिकाणी धान्य वाटप होत आहे, तर काही ठिकाणी रेशन धान्य वेळेवर मिळत नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. त्यात कोणते धान्य कोणत्या महिन्यातील वाटपाचे आहे, हे स्पष्ट समजत नसल्याने याचा फायदा घेत काही रेशन दुकानदार हे धान्य काळ्याबाजारात विक्री करीत असल्याचा आरोप होत आहेत. मागील आठवड्यात सेनगाव तालुक्यातून रेशनचे धान्य काळ्याबाजारात विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्यातील एकूण रेशनकार्ड- १८८८७३

अंत्योदय-२६३५९

अन्नसुरक्षा-१३१८३८

शेतकरी-३०७७६

रेशन मिळत असल्याने अडचणीत दिलासा?

कोरोनामुळे अनेकांच्या हातचे काम गेले होते. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित व वेळेवर धान्य मिळत आहे. त्यामुळे लाभार्थींच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे.

- सुरेश पाईकराव, येलकी

मागील दोन महिन्यांपासून काम नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. शासनाच्या घोषणेनुसार मोफत रेशन वाटप केले जात आहे. सध्या तरी रेशनसंदर्भात कोणतीही तक्रार नाही. रेशन मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे.

- दीपक पतंगे, येलकी

कोरोनामुळे हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. मोफत धान्यामुळे मागील वर्षी दिलासा मिळाला होता. याही वर्षी रेशन वाटप होत आहे, मात्र यातील तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याने लाभार्थी असा तांदूळ घेण्याचे टाळत आहेत.

- सुदर्शन पाईकराव, घोडा

धान्य घेतल्यानंतर अंगठा लावाच

अंगठा लावल्याने कोरोना पसरेल अशी भीती व्यक्त करीत ई-पॉस मशीनवर फक्त रेशन दुकानदाराचा अंगठा लावण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. याचाच गैरफायदा घेत काही रेशन दुकानदार हे धान्य काळ्याबाजारात विक्री करीत आहेत. त्यामुळे लाभार्थींनी सतर्क राहून दर महिन्याला मोफत धान्य घ्यावे. तसेच पात्र लाभार्थ्यांना एखादा दुकानदार धान्य देत नसेल तर अशांची जिल्हा व तालुका प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.