शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणासाठी ढोल-जागर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:39 IST

राज्यातील धनगर समाजाबांधवांना आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी धनगर समाजबांधवाकडून भव्य ढोल-जागर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यातील धनगर समाजाबांधवांना आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी धनगर समाजबांधवाकडून भव्य ढोल-जागर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे. समाजबांधवांनी एकत्र येऊन झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आरक्षण मागणीच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन आ. रामराव वडकुते यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.यावेळी लहुजी शेवाळे, विठ्ठल रबदडे, अ‍ॅड. बाबा नाईक, सुरेश भुमरे, अ‍ॅड. के. के. शिंदे, शिवाजी ढाले, विनोद नाईक, रवि गडदे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्टÑातील धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश असूनही राज्यातील धनगर समाजबांधवांना आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती तात्काळ लागू करू, असे सत्ताधाऱ्यांनी आवश्वास दिले होते. मात्र अद्याप याबाबत अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे धनगर समाज बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहे. आतापर्यंत सरकारच्या अडीचशे कॅबिनेटच्या बैठका झाल्या. परंतु एकाही बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला नसल्याचे आ. रामराव वडकुते म्हणाले. आंदोलनाचा पहिला टप्पा २७ आॅगस्ट रोजी होणार असून राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय धनगर वेशभूषेत संस्कृतीचे दर्शन घडवून आंदोलन केले जाणार आहे. पक्षपात बाजूला ठेवून समाजबांधव एकत्र येणार आहे. यावेळी समन्वय समिती वेळोवेळी आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.टप्प्या-टप्प्याने केले जाणार आंदोलन...४धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास उग्र आंदोलन केले जाईल. ३० सप्टेंबर रोजी परभणी येथे राज्यव्यापी ‘धनगर आरक्षण एल्गार महामेळावा’ होणार आहे. या ठिकाणी आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असणार आहे. एल्गार महामेळाव्यात जवळपास ५ लाखांपेक्षा जास्त समाजबांधव सहभागी होणार असल्याचे समन्वय समितीने सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा