शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भरवशाच्या रुग्णवाहिका झाल्या ‘ढकलस्टार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:24 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार अनेक दिवसांपासून ढेपाळलेला आहे. येथे कोणाचाच कोणाला ताळमेळ नसल्याने की काय? येथील जननी शिशु योजनेतील भरवशाच्या असलेल्या रुग्णवाहिकांना धक्का दिल्याशिवाय सुरुच होत नसल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी पहावयास मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार अनेक दिवसांपासून ढेपाळलेला आहे. येथे कोणाचाच कोणाला ताळमेळ नसल्याने की काय? येथील जननी शिशु योजनेतील भरवशाच्या असलेल्या रुग्णवाहिकांना धक्का दिल्याशिवाय सुरुच होत नसल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी पहावयास मिळाला.जिल्हा सामान्य रुग्णालयातील ढेपाळलेल्या कारभाराने मागील काही दिवसांपासून रुग्ण हैराण झाले आहे. या ठिकाणी वरिष्ठांचा जराही वचकच राहिलेला नसल्याने येथे कार्यरत असलेले अधिकारी - कर्मचारी, बहुतांश परिचारिका त्यांच्या मनाला वाटेल तसे कार्य बजावत आहेत. रुग्णांवर धावून जाणे ही तर नित्याचीच बाब आहे. ती वरिष्ठांच्या कानावर अनेकदा घालूनही त्यात जराही बदल झालेला नाही. तर विशेष बाब म्हणजे जननी शिशु योजनेंतर्गत प्रसूती मातांना घरापासून नेआण करण्यासाठी असलेल्या रुग्णवाहिकाही भंगार झाल्या आहेत. या रुग्णवाहिकांची एवढी भयंकर स्थिती आहे की, कुठे बंद पडतील आणि कोणत्या चढाला मोसम तोडतील याचा काही नेमच नाही. रुग्णवाहिका बंद पडली तर तेथेच प्रसुती होण्याची भीती निर्माण होत आहे. त्यातच या रुग्णवाहिकांवरील चालकांना अद्याप कायमच केलेले नसल्याने त्यांनाही रात्री-अपरात्री रुग्ण ने-आण करण्यात तेवढा रस उरत नसल्याचे चित्र आहे. तसेच नोंदणी कक्षात रजिस्टरसह चालक गायब होत असल्याने या ठिकाणी अनेकदा प्रसूती झालेल्या मातांना ताटकळत बसण्याशिवाय पर्याय नाही.