शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांची नाराजी असूनही उमेदवार लढतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:41 IST

लाकसभेचा प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असल्याने प्रचारयंत्रणा गतिमान झाल्या आहेत. युतीचा प्रचारावर थोडा जास्त जोर दिसत असून निद्रिस्तावस्थेतील आघाडीचे नेते त्यांच्या सोयीप्रमाणे प्रचारात फिरताना दिसत आहेत.

राजकुमार देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लाकसभेचा प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असल्याने प्रचारयंत्रणा गतिमान झाल्या आहेत. युतीचा प्रचारावर थोडा जास्त जोर दिसत असून निद्रिस्तावस्थेतील आघाडीचे नेते त्यांच्या सोयीप्रमाणे प्रचारात फिरताना दिसत आहेत. वंचित आघाडी, बसपाही शेवटच्या टप्प्यात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. सेना व काँग्रेस दोन्हींकडे उमेदवार बाहेरचा म्हणून कार्यकर्त्यांत नाराजी असली तरीही लढत याच दोघांत आहे.हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली विधानसभेत गट-तटांना खतपाणी घातल्याने खा.राजीव सातव व माजी आ.भाऊ राव पाटील गोरेगावकर यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत आहे. या वितुष्टातूनच सातव यांना माघार घ्यावी लागली, अशी चर्चा काँग्रेसचीच मंडळी करताना दिसते. तर गोरेगावकर यांच्यामुळेच काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी मिळाल्याचेही सांगितले जाते. यामुळे गोरेगावकर यांनी विधानसभेच्या दृष्टीने अधिक सक्रिय होणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादीकडून आ.रामराव वडकुते, दिलीप चव्हाण हेही प्रचारात दिसत आहेत. शिवाय सातव समर्थकांपैकी विनायक देशमुख हे थोडे जास्तच सक्रिय दिसत असून त्यांचे वैयक्तिक स्तरावरच प्रयत्न दिसत आहेत.शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्यासाठी मात्र शिवसैनिक एकजुटीने मैदानात उतरले आहेत. गावोगाव सभा, बैठकांचा फड रंगत आहे. आ.तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, रामेश्वर शिंदे, भैय्या पाटील गोरेगावकर, रुपाली पाटील गोरेगावकर यांनी प्रचारदौऱ्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. उमेदवार हेमंत पाटील यांच्याही काही ठिकाणी सभा झाल्या. वंचित आघाडीचे मोहन राठोड यांनी कनेरगावात सभा घेतली. काही भागात दौरेही केले. बसपाचे डॉ.दत्ता धनवे यांनीही धावता दौरा केला. अपक्ष संदेश चव्हाणही अधून-मधून दिसत आहेत.या मतदारसंघात शिवसेनेलाच कायम आघाडी मिळाल्याचे मागील पंधरा वर्षांतील आकडेवारी सांगते. मागच्या वेळी सातव निवडून आले तरीही येथे काँग्रेस मागेच होती. हा कलंक पुसून काढण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे. काँग्रेस व सेना दोन्हींच्या कार्यकर्त्यांत मात्र कोणताच उत्साह नाही. उमेदवार बाहेरचा हीच नाराजी दोन्हींकडे आहे. मात्र लढत या दोघांतच आहे, अशी विचित्र स्थिती येथे दिसते.

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक