शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

निर्जनस्थळ बनले गुन्हेगारांचे अड्डे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:33 IST

हिंगोली : हिंगोली शहरातील निर्जनस्थळे गुन्हेगारांचे अड्डे बनत चालले असून, अशा ठिकाणी लूटमार व महिला छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. ...

हिंगोली : हिंगोली शहरातील निर्जनस्थळे गुन्हेगारांचे अड्डे बनत चालले असून, अशा ठिकाणी लूटमार व महिला छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. पोलिसांच्या वतीने नियमित गस्त सुरू केल्याने अशा घटनांना आवर बसला असला तरी काही टपोरी मुले महिलांची छेडछाड करीत असल्याचे समोर येत आहे.

हिंगोली शहराची लोकसंख्या व वस्ती वाढत आहे. त्यामुळे शहराच्या चारही बाजूंनी बांधकामे वाढली आहेत. अनेकांनी कोरोनामुळे बांधकामे अर्धवट करून ठेवली आहेत. त्यात कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. यातून नवीन चेहरे गुन्हेगारीकडे वळत आहेत. निर्जनस्थळी गाठून लूटमार, महिला छेडछाडीचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येताच हिंगोली शहर पोलिसांनी शहरातील गस्त वाढविली. त्यामुळेच कोरोना काळातही गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलिसांना यश आले. मात्र काही दिवसांपूर्वी एनटीसी भागातील नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीच्या लगेच मुसक्या आवळल्या. तसेच साध्या गणवेशातील पोलीस कर्मचाऱ्यांसह गणवेशातील कर्मचाऱ्यांची शहरात गस्त वाढविली. यामुळेच अनुचित प्रकाराला आळा घालण्यात पोलिसांना यश आले.

ही ठिकाणे धोक्याचीच

रामलीला मैदान परिसर

हिंगोली शहरातील रामलीला मैदान परिसरात सायंकाळच्या सुमारास अनेक दारुडे, टपोरी मुले थांबलेली असतात. रात्रीच्या वेळी तर मोठी सावधगिरी बाळगावी लागते. कोणत्याही कारणाने पादचाऱ्याला थांबवून त्याच्याशी वाद घालणारी काही टपोरी मुले येथे दिसून येतात.

रेल्वे स्टेशन परिसर

हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रात्री उशिरापर्यंत काही दारुडे असतात. जिजामाता, आंबेडकरनगर, ज्योतीनगर, विशालनगर, हमालवाडी परिसरातील नागरिकांना येथून जावे लागते. या ठिकाणी एकट्या नागरिकास वाद घालून लूटमार होण्याच्या घटना घडतात.

रेल्वे उड्डाणपूल परिसर

हिंगोली शहरातील रेल्वे उड्डाणपूल परिसरातही काही टपोरी मुले सायंकाळच्या वेळी थांबतात. यापूर्वी येथे एकास लुटल्याची घटना घडली होती.

जुनी जि. प. इमारत ते नवीन जि. प. इमारत रोड

हिंगोली शहरातील जुनी जिल्हा परिषद इमारत ते नवीन जिल्हा परिषद इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक टपोरी मुले रात्रीच्या वेळी धूमस्टाइल दुचाकी पळवित असतात. जवळील मैदानावरही धूम्रपान करणे, दारू पिणे असे प्रकार घडतात. यातून गुन्हेगारीला बळ मिळते.

निर्जनस्थळांचा शोध घेणे गरजेचे

हिंगोली शहरातील निर्जनस्थळे गुन्हेगारांचे अड्डेच असतात. त्यामुळे निर्जनस्थळांचा शोध घेऊन तेथे थांबणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण केल्यास छेडछाड व लुटमारीच्या घटना रोखण्यात मदत होईल.

हिंगोली शहरात दोन चारचाकी, तीन दुचाकी वाहनाद्वारे १३ पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रीला नियमित गस्त घालतात. या शिवाय दिवसाही वर्दळीच्या ठिकाणी कर्मचारी लक्ष ठेवून असतात.

- पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक, शहर ठाणे, हिंगोली

शहरातील विनयभंग व बलात्काराच्या घटना

वर्ष संख्या

२०१८ १९

२०१९ १८

२०२० ११

२०२१ १०