शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वारंगाफाटा स्थानकात बस नेण्यासाठी खाजगी कामगार तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:25 IST

राष्ट्रीय महामार्गावर मध्यभागी उभे राहून स्थानकात बस घेऊन जा, अशी विनंती करण्याची वेळ एसटी महामंडळावर आली आहे. अनेक चालक या विनंतीकडे दुर्लक्ष करून याकामी तैनात केलेल्या खाजगी कामगारांसोबत हुज्जत घालताना दिसत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवारंगाफाटा : राष्ट्रीय महामार्गावर मध्यभागी उभे राहून स्थानकात बस घेऊन जा, अशी विनंती करण्याची वेळ एसटी महामंडळावर आली आहे. अनेक चालक या विनंतीकडे दुर्लक्ष करून याकामी तैनात केलेल्या खाजगी कामगारांसोबत हुज्जत घालताना दिसत आहेत.वारंगाफाटा हे राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून येथून खूप मोठ्या प्रमाणावर एसटी बसची वर्दळ असते. वारंगा फाटा येथे बसस्थानक असून एसटी बसेस थांबण्यासाठी मैदान आहे. या ठिकाणी प्रवाशांना निवाºयाची चांगली व्यवस्था आहे. परंतु मागील दहा ते बारा वर्षापासून वसमत-वारंगा या एकमेव बस व्यतिरिक्त एकही बस बसस्थानकात जात नाही. याविषयी अनेक वेळा जनतेतून तसेच वर्तमानपत्रातून माहिती दिली जात होती. परंतु संबंधित एसटी महामंडळावर याचा काहीही परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. सदरील बसस्थानकाचा अवैध वाहतूक थांबविण्यास व गॅरेजसह इतरही कामासाठी उपयोग केला जात आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याचा परिणाम संबंधितांवर झाला आहे. बातमी प्रकशित झाल्यापासून कळमनुरी आगारचा एक कर्मचारी सर्व एसटी बसची नोंद घेण्यासाठी वारंगा फाटा बसस्थानकात नियुक्त केला आहे. तेव्हा कुठे काही प्रमाणात चालक स्थानकात बस आणत आहेत. चौकातच थांबत असलेल्या बसच्या चालकांना बसस्थानकातच जाऊन थांबविण्याची विनंती करण्यासाठी बाळापूर येथील १७ वर्षांपासून बसस्थानकात काम करणारे भारत सखाराम मीरटकर वारंगा येथे पाठविले आहे.मीरटकर यांची एसटी महामंडळात कुठल्याही प्रकारची अधिकृत नियुक्ती नाही. असे असतानाही मीरटकर या मार्गावर भर रस्त्याच्या मध्यभागी व वाहनाच्या वर्दळीत उभे राहून आपला जीव धोक्यात घालून चौकातच बस थांबविणाºया बसचालकांना स्थानकात बस नेण्यासाठी प्रत्येक बस चालकास विनंती करीत आहेत. त्यापैकी २५ ते ३० टक्केच बस चालक मिरटकर यांच्या शब्दाला मान देऊन बस बसस्थानकात घेऊन जात आहेत. बरेच चालक तर मीरटकर यांच्याशी हुज्जत घालत रस्त्यावरच प्रवाशी उतरवुन निघून जात आहेत.त्यामुळे या ठिकाणी चालकांना बसस्थानकाचा मार्ग दाखविण्याासठी नियुक्त करण्यात आलेले दोघेही पुरते वैतागुन गेले आहेत. लाखों रुपये खर्चून उभारलेल्या बसस्थानकात बस घेऊन जाण्यास चालकांना काय अवघड वाटत असावे? याचा काय अद्याप शोध लागलेला नाही. स्थानकात बस नेण्याची विनंती करण्याची वेळ नागरिकांसह संबंधित एसटी महामंडळावर आली असून चालक, वाहक मात्र कोणाचेही ऐकण्यास तयार नाहीत. त्यामुळे यावर प्रवाशांना पळत जावून बस पकडण्याशिवाय पर्यायच नाही. सदरील एसटी चालकांना बस ही स्थानकात नेण्याची विनंती करण्याऐवजी सक्तीचे करण्याची गरज असल्याचे प्रवाशातून बोलल्या जात आहे. निदान चौकात उभे राहून बसची प्रतिक्षा पाहण्याची वेळ कायमची टाळण्यास मदत होऊन चालकांची सवय मोडून जाईल.बस मागे धावण्याची वेळबसस्थानक उभारल्यापासून मोजकेच दिवस स्थानकात बस गेल्या आहेत. त्यामुळे एवढे मोठे बसस्थानक उभारले तरी कशाला? असा सवाल प्रवाशांतून केला जात आहे. स्थानकात बस येत नसल्याने प्रवाशी उन्हा तान्हात चौकात किंवा स्थानकाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून बसची प्रतीक्षा करीत आहेत.वारंवार वरिष्टाकडे तक्रारी करुनही चालकांवर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. चालकांची एवढी मुजोरी नेमकी वाढली तरी कशी काय? असे एक ना अनेक तर्क लावले जात आहेत. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.