शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर महासंघाचे मागणीसाठी साकडे

By admin | Updated: July 20, 2014 00:25 IST

हिंगोली : धनगर समाजास एस.टी.प्रवर्गाचे आरक्षण देऊन अनुसूचित जमातीच्या शासकीय सवलती लागू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेच्या जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे.

हिंगोली : धनगर समाजास एस.टी.प्रवर्गाचे आरक्षण देऊन अनुसूचित जमातीच्या शासकीय सवलती लागू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ व मल्हार सेनेच्या जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विलास खरात, लखनराव शिंदे, गजानन डाळ, भास्करराव पोले, आनंदराव खरात, राहुल खरात, विठ्ठल खरात, प्रकाश खरात, मुंजाजी बंडे, समाधान शिंदे, शाम हिरवे, आनंदा बारसे, अमोल कुंभारकर यांनी प्रशासनास हे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश असून धनगर व धनगड या दोन वेगळ्या जमाती आहेत, या मुद्दयावरून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. याचा परिणाम धनगर समाज आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रात इतरांपेक्षा मागास राहिला आहे. २००२ साली चलिया यांच्या अध्यक्षतेखाली घटना पुनर्विलोकन आयोग महाराष्ट्रात आला असता त्यांच्यासमोर धनगर समाजाचे म्हणणे मांडण्यात आले होते. त्यानुसार उत्तर प्रदेशातील हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार धनगर व धनगड हे दोन्ही शब्द एकच अर्थी असल्याचे मान्य केले आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजास एस.टी.प्रवर्गाच्या सर्व सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी २० वर्षापासून सनदशीरपणे, लोकशाही मार्गाने अांदोलन करण्यात येत आहे. परंतू केवळ आश्वासनेच दिली जात असल्याने धनगर समाजात असंतोष पसरल्याचेही निवेदनात नमूद आहे.