शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका व महावितरणमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:31 IST

नगरपालिका व महावितरणमध्ये पथदिव्यांच्या देयकावरून चांगलीच जुंपली आहे. १.0३ कोटींचा वीज बिल भरणा करूनही महावितरण केवळ २५ लाख रूपये भरल्याचे सांगत आहे. त्यामुळे शहरात अंधार पसरत असून एखादा अनुचित प्रकार घडल्यास महावितरणला जबाबदार धरुन फौजदारी का करू नये, असे पत्र न.प. प्रशासनाने दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नगरपालिका व महावितरणमध्ये पथदिव्यांच्या देयकावरून चांगलीच जुंपली आहे. १.0३ कोटींचा वीज बिल भरणा करूनही महावितरण केवळ २५ लाख रूपये भरल्याचे सांगत आहे. त्यामुळे शहरात अंधार पसरत असून एखादा अनुचित प्रकार घडल्यास महावितरणला जबाबदार धरुन फौजदारी का करू नये, असे पत्र न.प. प्रशासनाने दिले आहे.महावितरणतर्फे मागील दोन महिन्यांपासून थकीत वीजबिल वसुली मोहीम राबविली जात आहे. यात महावितरणने हिंगोली नगरपालिकेचा वीजपुरवठाही खंडित केला. थकीत बिल भरणा करावा, याबाबत महावितरणने न.प.ला पत्र पाठविले. परंतु त्यात नमूद रक्कम चुकीची असल्याचा आरोप पालिकेने केला आहे. हिंगोली शहरातील पथदिव्यांची विद्युत देयकाची रक्कम ज्यामध्ये मुळ थकबाकी ४.४५ कोटी व त्यावरील व्याज १.९६ कोटी असे एकूण ६.४१ कोटी थकबाकी आहे. तसेच यातील केवळ २५ लक्ष महावितणकडे पालिकेने भरणा केल्याचे म्हटले. परंतु सदर माहिती चुकीची व मोघम असून महावितरण पालिका प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी पत्रात म्हणाले. नगरपालिका कार्यालयामार्फत २०१७-१८ मध्ये एकूण १.0३ कोटींचा भरणा केला आहे. परंतु विद्युत कंपनी केवळ २५ लाख रूपयेच भरले असे म्हणत आहे. तर शहरात आयपीडीएस योजनेत कामे झाल्याने पथदिवे वाढल्याचे महावितरण सांगत आहे. ही कामे कुठे झाली? यामुळे किती नवीन ट्रान्सफार्मर व मीटर पथदिव्यांसाठी बसविले, अशी विचारणा करून महावितरणच्या मर्मावर बोट ठेवले आहे. तर मीटर रिडींगप्रमाणे देयके दाखवावी व वीज दरात झालेल्या वाढीचा तपशिलही मागितल्याने गोची होणार असल्याचे दिसत आहे.पालिकेने चालू वर्षाचे अतिरिक्त देयके अदा करूनही महावितरणतर्फे जाणीवपूर्वक पथदिव्यांची वीज तोडली आहे. त्यामुळे जर शहरात काही अनुचित प्रकार घडला अथवा हानी झाल्यास महावितरण जबाबदार राहील, असेही पत्रात म्हटले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण