हिंगोली : बँकेचे कर्ज, सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकरी महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना केसापूर शिवारात घडली. ३० मार्चला ही घटना उघडकीस आली.केसापूर (ता. हिंगोली) येथील राधाबाई किसन खंदारे यांनी बँकेचे कर्ज व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. त्यांनी शेत शिवारातील विहिरीत उडी घेतल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किसन खंदारे यांच्या माहितीवरून नर्सी नामदेव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)
कर्जबाजारी शेतकरी महिलेची आत्महत्या
By admin | Updated: April 1, 2017 03:59 IST