शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दोन नराधमांना फाशीची शिक्षा

By admin | Updated: April 7, 2017 16:19 IST

कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे ५ वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करून तिचा खून करणाºया दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.पी. दिवटे यांनी

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 07 -   कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे ५ वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करून तिचा खून करणाºया दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.पी. दिवटे यांनी ७ एप्रिल रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर यात पुरावा नष्ट करण्यास मदत करणा-या पाच जणांची सबळ पुराव्याअभावी काल निर्दोष मुक्तता केली होती.
वारंगा मसाई येथील सदर ४ वर्षीय चिमुकली अंगणवाडीची शाळा सुटल्यानंतर ७ जानेवारी २0१६ रोजी घरी आली होती. जेवण करून ती बाहेर गेली अन् परतलीच नाही. त्यानंतर ती शोध घेवूनही सापडत नव्हती. काळजीपोटी दुपारी ३.३0 च्या सुमारास गावातील मसाराव वाघमारे यांनी पार्डी येथे मजुरीस गेलेल्या तिच्या वडिलांना ही बाब भ्रमणध्वनीवरून कळविली. तिच्या वडिलांनी साडेचारच्या सुमारास गावात आले. घरी त्यांची आई, सावत्र आई, पत्नी, भाऊ व मित्र होता. चौकशी सुरू केली. तेव्हा सावत्र आईने सांगितले की, ही मुलगी जेवण करून दारात बहिणीसोबत खेळत होती. त्यानंतर भागवत परबती क्षीरसागर व राहुल ऊर्फ सतीश बबन क्षीरसागर हे दोघे तेथे आले. त्यांनी या चिमुकलीस चॉकलेटचे आमिष दाखवून दुकानावर नेले. तेव्हापासून ते दोघे व ही मुलगीही परतली नाही.
यानंतर पुन्हा फिर्यादी तथा पीडित मयताच्या पित्याने गावक-यांना सोबत घेवून मुलीचा शोध घेतला. त्यानंतर ते कळमनुरी पोलिस ठाण्यात गेले. पोलिस येईपर्यंत रात्र झाली होती. त्यानंतर ग्रामस्थ व पोलिसांनी परबती यशवंता क्षीरसागर यांच्या घरात शोधला घेता असता मुलगी पांढºया रंगाच्या पोत्यात बांधून ठेवल्याचे आढळले. ती मृत झाली होती. तर तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला होता. तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. शिवाय तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे दिसत होते. त्यानंतर याबाबतची फिर्याद फौजदार पी.एस. गोमासे यांनी नोंदवून घेतली. यात बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमासह विविध कलमान्वये भागवत परबती क्षीरसागर (१८), राहुल बबन क्षीरसागर (२१), परबती यशवंता क्षीरसागर, बबन खंडुजी क्षीरसागर, कवीनारायण परबती क्षीरसागर, पंचफुलाबाई परबती क्षीरसागर, शोभाबाई बबन क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तर तपास पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केला. त्यांच्या बदलीनंतर उपविभागीय अधिकारी प्रसन्न मोरे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
बालसंरक्षण विशेष खटला विशेष अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश एम.पी.दिवटे यांच्यासमोर चालविण्यात आला. यात एकूण २५ साक्षीदार तपासले होते. तर भक्कम पुरावेही सादर करण्यात आले. यात भागवत व राहुल या दोघांचा गुन्हा सिद्ध झाला. तर इतर आरोपींना कालच सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करून निकाल राखून ठेवण्यात आला होता. यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. ज्ञानेश्वर टेकनूर यांनी काम पाहिले.
 
अशी झाली शिक्षा
राहुल व भागवतला भा.दं.वि.च्या क.३६३ नुसार ७ वर्षे शिक्षा व ५00 रुपये दंड तर दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास, क.३६६ नुसार १0 वर्षे शिक्षा व १ हजार रुपये दंड तर दंड न भरल्यास ६ महिने कारावास, कलम ३७६ नुसार आजन्म कारावास व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास, क.३७७ नुसार आजन्म कारावास व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास, कलम २0१ नुसार ७ वर्षे शिक्षा व ५00 रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तर क.३0२ भादंविनुसार भागवत व राहुलला फाशीची शिक्षा ठोठावली असून उच्च न्यायालयाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आली आहे.