शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

३ दिवसांत आगाराचे १० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:46 IST

कोरेगाव भीमा येथील घटनेमुळे मागील ३ दिवसांपासून येथील एस.टी. आगारातून बसेस सोडल्या नाहीत. त्यामुळे तीन दिवसांत आगाराचे १० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आगारप्रमुख एस.ए. आझादे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : कोरेगाव भीमा येथील घटनेमुळे मागील ३ दिवसांपासून येथील एस.टी. आगारातून बसेस सोडल्या नाहीत. त्यामुळे तीन दिवसांत आगाराचे १० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आगारप्रमुख एस.ए. आझादे यांनी दिली.येथील आगारातून २ जानेवारी रोजी फक्त ७ फेºयाच सोडण्यात आल्या. ३ जानेवारी रोजी आगारातून एकही बस सोडली नाही तर ४ रोजी फक्त ९ बस फेºया सोडल्या. या आगारात ३९ बसेस आहेत. दररोज १८४ बसफेºया होतात. आगाराचे दररोजचे उत्पन्न साडेतीन ते चार लाख रुपये येते. बसेस तीन दिवसांपासून बंद असल्याचे आगाराचे १० लाखांचे नुकसान झाले. माजलगाव येथील एका एस.टी. बसची तीन दिवसांपूर्वी तोडफोड केली. एस.टी. बसेस बंद असल्यामुळे बसस्थानकावरची गर्दीही ओसरली आहे. अवैध वाहतुकीच्या वाहनाने प्रवासी प्रवास करत आहेत. ४ जानेवारी रोजी नांदेडसाठी तीन, परभणीसाठी ४ व पुसद मार्गावर बसेस सोडल्या. बसेस केव्हा सुरू होतील, अशी विचारणा प्रवासी करत आहेत. ५ जानेवारीपासून पूर्ववत सर्व बसफेºया सोडण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख आझादे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या बंदमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे अनेकांनी तर बाहेर निघणेच टाळले होते. तर काही खाजगी वाहनांकडे धाव घेत होते.तारांबळ : अनेकांनी टाळले बाहेर पडणेकोरेगाव भीमाच्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्टÑात बंद पाळला आहे. त्याच पार्श्वभूमिवर बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. शिवाय, खाजगी वाहतूकही बंद असल्याने या काळात आगाराचे तर नुकसान झालेच आहे. त्याचबरोबर प्रवाशांचीही मोठी तारांबळ झाली होती. प्रवासी खाजगी वाहनाकडेधाव घेत होते. मात्र मोजक्याच मार्गावरुन वाहतूक सुरु होती. तर जिल्ह्यात ४ जानेवारी रोजी निघलेल्या मोर्चामुळे खाजगी वाहतूक सेवाही ठप्प होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. तर महत्त्वाचे काम असणारेच प्रवासी प्रवास करीत होते.कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्टÑभर बंद पाळण्यात आला होता. परंतु ५ जानेवारीपासून बससेवा सुरु होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.