जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. २३ डिसेंबरपासून जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होऊ घातली आहे. २३ डिसेंबरपासून ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. २२ ते २४ डिसेंबर या काळात जात प्रमाणपत्राचे ८०० अर्ज प्राप्त झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सामाजिक न्या विभागाच्या वतीने सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळा रांगेत अर्ज भरा व प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहनही करण्यात येत आहे, असे संशोधन अधिकारी गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दोन पोलिसांची नियुक्ती केली आहे. परंतु, नियुक्त केलेल्या दोन पोलिसांना कोणीही जुमानत नव्हते. रांगेतही उमेदवारांनी मास्कचा वापर केलेला पहायला मिळत नव्हता. सामाजिक आंतराचा फज्जा उडालेलाही या ठिकाणी पहायला मिळाला. कोरोना काळात तरी प्रशासनाने काळजी घेणे आवश्यकता आहे.
विद्यार्थी येत आहेत प्रमाणपत्रासाठी
हिंगोली: जिल्ह्यात काही ठिकाणी शाळ, महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत आहेत. जात प्रमाणपत्राचे अर्ज दिल्यानंतर ते लगेच निघूनही जात आहेत. नंतर मात्र ग्रा. पं. उमेदवारच राहत आहेत.
भावी उमेदवारांना मास्कचा विसर
हिंगोली: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जातप्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जिल्ह्यातून ग्रा. पं. चे भावी उमेदवार कार्यालयात येवून प्रमाणपपत्र सादर करत आहेत. परंतु, मास्कचा वापर कोणीही केलेला नव्हता. सामाजिक आंतरही कोणीही ठेवलेले पहायला मिळाले नाही.
हिंगोली : जिल्ह्यात २३ डिसेंबरपासून ग्रामपंचायत उमेदवारीसाठी जात प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रांची आवश्यकता असल्याने सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत अर्ज स्वीकारले जात आहेत. २२ ते २३ डिसेंबर या तीन दिवसांच्या काळात जवळपास ८०० अर्ज जात पडताळणीसाठीचे तपासले आहेत. यापुढे शासकीय सुटीलाही कायर्यालय सुरुच राहणार आहे.
- गीता गुठ्ठे, संशोधन अधिकारी, जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, हिंगोली