शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कडब्याचे दर गगनाला, पशुपालक चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST

कौठा : वसमत तालुक्यातील ग्रामीण भागात कडबा उत्पादन नसल्याने कडब्याला मागणी वाढत आहे. परिणामी, भावही वाढले असून पशुपालक चिंतित ...

कौठा : वसमत तालुक्यातील ग्रामीण भागात कडबा उत्पादन नसल्याने कडब्याला मागणी वाढत आहे. परिणामी, भावही वाढले असून पशुपालक चिंतित आहेत.

गत पाच-सहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. रखरखत्या उन्हात जनावरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे उन्हाळ्यात चारा साठवण करण्यासाठी पशुपालक शेतकरी धडपडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कौठा, बोराळा, खुदनापूर, कुरुंदा, गिरगाव, मालवटा, आसेगाव आदी भागांमध्ये गतवर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे आजपर्यंत काही ठिकाणी हिरवा चारा उपलब्ध आहे. परंतु, कोरडवाहू ठिकाणी हिरवा चारा पाहायलाही मिळत नाही.

सद्य:स्थितीत कडब्याचे भाव हे दोन हजार तर अडीच हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे या भागातील पशुपालक वर्ग चिंतित आहे. कोरोना व लॉकडाऊनच्या काळात अगोदरच शेतीचे उत्पादन घटले असल्याने पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चारा मिळणे झाले कठीण?

या वर्षी पाऊस चांगला झाला असला तरी आज बहुतांश ठिकाणी हिरवा चारा उपलब्ध नाही. चारा मिळत नसल्यामुळे जनावरे विकण्याची वेळ आली आहे. महागामोलाचा कडबा आम्हाला घेणे सध्या परवडेना झाले आहे. पुढे चालून कडबा अजून महाग होण्याची शक्यता असल्याने त्याचा सांभाळ आतापासूनच करीत आहोत.

- रंगनाथ कवठेकर, पशुपालक