शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जागा ताबा प्रकरणात बाळापुरात २३६ जणांना न्यायालयाचे समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 19:42 IST

येथील मुख्य बाजारपेठ, निवासी भाग, जि.प. शाळेसह इतरांनी ग्रा.पं.सह संगनमत करून जमीनीवर ताबा केला. त्यातून ग्रा.पं.भाडेवसूल करून नफा कमावत आहे. ती जागा रिकामी करावी व मोबदला मिळावा यासाठी जमिनीच्या मूळ मालक व वारसदारांनी हिंगोलीच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

ठळक मुद्देआखाडा बाळापूर येथील सर्वे नं. २५ मधील  १० एकर ३६ गुंठे जमीन शासनाने संपादित केली होतीत्यासाठी मावेजा देवू केला होता. पण तो कमी असल्याने व नाराजीमुळे तो स्वीकारला नाही. परंतु कालांतराने ग्रामपंचायतीने या जागेत व्यापारासाठी, राहण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा देवून टोलेजंग दुकाने उभारली आहेत.

आखाडा बाळापूर ( हिंगोली ): येथील मुख्य बाजारपेठ, निवासी भाग, जि.प. शाळेसह इतरांनी ग्रा.पं.सह संगनमत करून जमीनीवर ताबा केला. त्यातून ग्रा.पं.भाडेवसूल करून नफा कमावत आहे. ती जागा रिकामी करावी व मोबदला मिळावा यासाठी जमिनीच्या मूळ मालक व वारसदारांनी हिंगोलीच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या प्रकरणी बाळापुरात २२७ भाडेकरू, ताबाधारक व इतर ९ आशा एकूण २३६ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामुळे बाळापूर व्यापारपेठेत एकच खळबळ माजली असून वकील शोधण्यासाठी धावपळ पहावयास मिळाली. 

आखाडा बाळापूर येथील सर्वे नं. २५ मधील  १० एकर ३६ गुंठे जमीन शासनाने संपादित केली होती. त्यासाठी मावेजा देवू केला होता. पण तो कमी असल्याने व नाराजीमुळे तो स्वीकारला नाही. परंतु कालांतराने ग्रामपंचायतीने या जागेत व्यापारासाठी, राहण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा देवून टोलेजंग दुकाने उभारली आहेत. शिवाय सांस्कृतिक सभागृह, शाळा, कार्यालये, स्वा.सै. सभागृह थाटली आहेत. आज २३३ व्यापारी दुकाने ग्रामपंचायतीने भाड्याने दिलेली असून ग्रामपंचायत दरमहा एक लाख १६ हजार ५०० रुपये नफा कमावतो. मागील तीन वर्षात ४१ लाख ९४ हजार रुपये मिळकत मिळाली आहे. सदर जमिनीवरील हा ताबा काढून जमीन मूळ मालकास मिळावी व त्या जमिनीवर वर्षानुवर्षे कमाई करणार्‍यांकडून मोबदला मिळावा, या मागणीची याचिका सारजाबाई विठ्ठल बोंढारे व इतर यांनी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, हिंगोली या न्यायालयात दाखल केली आहे. 

अनेक दिग्गज यंत्रणांचा समावेशयात २२७ भाडेकरूंसह ग्रामपंचायत आखाडा बाळापूर, सरपंच, ग्रामसेवक, कुसूमताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहाच्या सर्वसक्षम यंत्रणा, मुख्याध्यापक जि.प. मुलींची शाळा बाळापूर, जी.एस. खुडे (आदिवासी वसतीगृह), दिपाजी पाटील स्वातंत्र्यसैनिक सभागृहाचे सक्षम अधिकारी, भूसंपादन अधिकारी, अप्पर पैनगंगा प्रकल्प नं. २, हिंगोली, जिल्हाधिकारी हिंगोली यांना न्यायालयाने समन्स बजावले असून २७ फेब्रुवारी रोजी न्यायाल्यात स्वत: किंवा वकीलामार्फत हजर होण्यास सांगितले जात आहे. मराठवाडा चौक ते आदिवासी वसतीगृहापर्यंत मुख्य बाजारपेठेत सर्वांनाच नोटिसा मिळाल्याने मोठी खळबळ माजली.  समुहा-समुहाने व्यापारी वकीलांच्या शोधात असून चर्चेला मोठे उधाण आले आहे. एकंदरीत जागा हस्तांतरण ते दावा या काळाच्या ऐतिहासिक आठवणी यानिमित्ताने उजळल्या आहेत. 

टॅग्स :Courtन्यायालयHingoliहिंगोली