शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात कोरोना सुसाट; ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ना आयसोलेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST

हिंगोली : सध्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. एक तर रुग्ण स्वत:च तपासणीस टाळाटाळ ...

हिंगोली : सध्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. एक तर रुग्ण स्वत:च तपासणीस टाळाटाळ करीत असून, रुग्ण आढळला तरीही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, त्यांचे विलगीकरण करणे या बाबींना अपुऱ्या मनुष्यबळामुळे फाटाच दिला जात असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून रोज सरासरी दोनशे ते अडीचशे रुग्ण आढळत आहेत. यातील साठ टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातीलच असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी ८० टक्के शहरी, तर उर्वरित ग्रामीणचे दिसायचे. आता हे पालटलेले चित्र आरोग्य विभागाला त्रासदायक ठरत आहे. शहरी भागात कोरोनाबद्दल सजगता आहे. लोक स्वत:हून तपासण्या करतात. रुग्ण आढळल्यास निदान कुटुंबियांची तरी चाचणी होते. शिवाय नजीकच्या संपर्कातील लोकांना वेगळे राहण्यास सांगितले जाते. अथवा चाचणी करून घेतात. ग्रामीण भागात हे काहीच होत नाही. त्यातच रुग्ण आढळला तर त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तर अजून अवघड. शिवाय यासाठी आरोग्याकडे वेगळे मनुष्यबळही नाही. उपचार करण्यासाठीच मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे या ट्रेसिंगचे काम रामभरोसे आहे. ज्या रुग्णांचे नातेवाईक सजग आहेत, ते थोडेबहुत पथ्य पाळत आहेत. इतरांना कोणी विचारतही नाही. शिवाय रुग्णांच्या संपर्कातील लोकांना निदान विलगीकरणात तरी ठेवणे अपेक्षित असताना तसे होत नाही.

गावांमध्ये वाॅच कोणाचा?

ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी ग्रामपातळीवर समित्या स्थापन केल्या. मात्र, या समित्याच कार्यरत नसल्याचे चित्र अनेक गावांत आहे. रुग्ण आढळला तरीही ही मंडळी पुढची जबाबदारी पार पाडत नाहीत.

समितीतील अनेक जण मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे थंडीत कुडकुडणाऱ्याला माळावरच्या जाळाचा काय फायदा होणार, अशी स्थिती आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच नाही

ग्रामीण भागात रुग्ण आढळला तर त्यांच्या घरातील लोकांनाही कोणी तपासणीला बोलावत नाही. अंगणवाडी कार्यकर्ती, आशा यांनी लक्ष घातले तर तेव्हा संपर्कातील लोकांना नेले जाते. आराेग्यातील काही कर्मचारी व शिक्षकांना रुग्ण घरी आल्यानंतर विलगीकरणात राहतो की नाही, हे तपासण्यासह स्टिकर लावण्याचे काम दिले. मात्र, तेही १०० टक्के होत नाही. तुरळक ठिकाणी होते.

जिल्ह्यातील आतापर्यंतचे रुग्ण ८९६८

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ४२००

गावामध्ये होम आयसोलेट रुग्ण ०००

हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून लागलीच तपासण्या केल्या जात आहेत. अजूनही रुग्णांसाठी दीड हजार खाटा उपलब्ध असल्याने होम आयसोलेशन केले जात नाही.

डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी.