शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयाने जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:14 IST

जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने समन्वय आणि सहकार्य करत आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने समन्वय आणि सहकार्य करत आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित स्वागत व निरोप कार्यक्रमात जयवंशी हे बोलत होते. यावेळी मावळते जिल्हाधिकारी अनिल भंडारी, श्रीमती भंडारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर यांची उपस्थिती होती.यावेळी जयवंशी म्हणाले की, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून जिल्ह्याची विकासाकडे यशस्वी वाटचाल सुरु आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यात स्त्रोत कमी आणि आव्हाने अधिक आहेत. याकरिता सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवत व सहकार्य करत जिल्ह्याच्या विकासकामासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भंडारी यांनी जिल्ह्याच्या विकासाची जी परंपरा सुरु केली आहे. ती अशीच आपण पुढे ही चालू ठेवू, असेही जयवंशी यावेळी म्हणाले.भंडारी म्हणाले की, हिंगोलीतील सुमारे सव्वादोन वर्षाच्या कार्यकाळात अनेक आव्हाने सामोरे होती. परंतु सर्वांचे सहकार्य व समन्वयाने प्रत्येक आव्हान स्वीकारत यशस्वी कामे करता आली. जलयुक्त शिवार, लिगो, राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे मार्ग भूसंपादन, सातबारा संगणकीकरण असे अनेक महत्त्वपूर्ण कामे करता आली. हिंगोली जिल्ह्यातील कार्यकाळ माझ्या जीवनातीत अविस्मरणीय क्षण असल्याचे ही भंडारी यावेळी म्हणाले.प्रास्ताविक अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांनी केले. तसेच यावेळी सीईओ तुम्मोड, योगेश कुमार, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर आदींची समयोचित भाषणे झाली.यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी, पत्रकार, स्वयंसेवी स्ंसथांचे प्रमुख, विविध संघटनाचे प्रमुख यांनी पुष्पगुच्छ देत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे स्वागत आणि माजी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना निरोप दिला.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीcollectorजिल्हाधिकारी