पोत्रा : कळमनुरी तालुक्यातील बोल्डावाडी येथे सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.
बोल्डावाडी गावाने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी करून अनेक पारितोषिके पटकाविली आहेत. त्या अनुषंगाने येथे ‘शेतकरी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १९ फेब्रुवारी राेजी पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, विभागीय समन्वयक संतोष शिनगारे, तालुका समन्वयक भागवत कोटकर यांनी भेट देऊन तेथील शेतकरी, महिला बचतगट तसेच गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतीसाठी लागणारे पाणी, पिण्याचे पाणी यांविषयी महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमास सरपंच पुण्यरथा कऱ्हाळे, उपसरपंच बारीकराव मोरे, नागोराव कराळे, विठ्ठल मोरे, सुधाकर कऱ्हाळे, संदीप कऱ्हाळे, गोरखनाथ मोरे, सीताराम मोरे, संजय कऱ्हाळे, उज्ज्वला मोरे, प्रीती कऱ्हाळे, पुष्पा चौरे, सुनीता कऱ्हाळे, अर्चना बर्गे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
..................
फाेटाे नं. ०७