शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘डीपीसीतील कामे पूर्ण करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:27 IST

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्यय खर्च करण्यासाठी संबंधित विभागांनी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्यय खर्च करण्यासाठी संबंधित विभागांनी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत जयवंशी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, आगामी कालावधीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेवून सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात मंजूर झालेला योजनातंर्गत निधींच्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी पाठपुरावा करावा. तसेच तांत्रिक मान्यता मिळालेल्या कामे पूर्ण करून उपलब्ध निधी वेळेत खर्च करावा. सदर निधी समर्पित होणार नाही, याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी.सर्व संबंधीत विभागांनी दर आठवड्याला कामांचा आणि खर्चित-अखर्चित निधीचा अहवाल सादर करावा. तसेच जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ अंतर्गत पुनर्विनियोजनाचे प्रस्ताव आणि जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना आणि अनुसूचित जमाती उपयोजना सन २०१९-२० अंतर्गत सन २०१९-२० चे आराखडे वेळेत नियोजन विभागाकडे सादर करण्याचे निर्देशही दिले. अनेक विभागांनी तर अजून निधीचीच मागणी केली नसल्याचे समोर आले.

 

 

 

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीEconomyअर्थव्यवस्था