शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सदस्यांच्या जिवाची घालमेल सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:16 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींनी वेळेत जातवैधता प्रमाणपत्र दाखल न केल्याने पद जाण्याची टांगती तलवार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कोसळण्याची भीती आहे. त्यातच शासनही माहिती मागवित असल्याने सदस्यांची धास्ती वाढत चालली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींनी वेळेत जातवैधता प्रमाणपत्र दाखल न केल्याने पद जाण्याची टांगती तलवार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कोसळण्याची भीती आहे. त्यातच शासनही माहिती मागवित असल्याने सदस्यांची धास्ती वाढत चालली आहे.एकीकडे नगरसेवकांबाबत नगरविकास विभागाकडून माहिती मागविली जात असताना दुसरीकडे जि.प. व पं.स. सदस्यांबाबत तहसील प्रशासनाकडून माहिती मागविण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात सात नगरसेवकांनी निवडणुकीनंतर सहा महिन्याच्या आत जात पडताळणी सादर केली नव्हती. तर वसमतचे नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार हे आठवे होते. नगरसेवकांमध्ये हिंगोली येथील उषा ढबाले, अनिता गुट्टे, आनंदा खंदारे, कळमनुरीतील शकुंतला बुरसे, वसमतमधील साधना पुंडगे, वैशाली इंगळे, रविकिरण वाघमारे यांचा यात समावेश होता. आता पुन्हा या नगरसेवकांसह सर्वांचीच पक्षनिहाय आकडेवारी मागविली गेल्याने नेमका काय प्रकार सुरू आहे, याबाबत नगरसेवक धास्तावलेले आहेत.दुसरीकडे जि.प. व पं.स. सदस्यांमध्येही असे अनेकजण आहेत. त्यांनाही आता तहसील कार्यालयातून संपर्क करून जातवैधता प्रमाणपत्रांबाबत विचारणा केली जात आहे. ज्यांनी अर्जासोबतच प्रमाणपत्र दिले, अशांनाही यात विचारणा होत असल्याने ही मंडळी हैराण दिसत आहे.जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव वेळेत असेल तर ती देण्याची जबाबदारी समितीचीच आहे. त्यामुळे नाहक लोकप्रतिनिधींना यात मन:स्ताप होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यात खरेच दिलासा मिळतो की कसे? याची उत्कंठा आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण