शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वसमतला दुसºया दिवशीही बंद व जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:21 IST

भीमा कोरेगाव घटनेच्य निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्टÑ बंदच्या आवाहनाला वसमतमध्ये प्रतिसाद मिळाला. बुधवारी वसमत बाजारपेठ बंदच राहिली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर काही उपद्रविंनी गल्लीबोळात फिरुन दुचाकी, अ‍ॅटोला आगी लावल्या. शांतताभंग करण्याच्या हेतूने हा प्रकार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यात एकूण दहा लाखांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : भीमा कोरेगाव घटनेच्य निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्टÑ बंदच्या आवाहनाला वसमतमध्ये प्रतिसाद मिळाला. बुधवारी वसमत बाजारपेठ बंदच राहिली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर काही उपद्रविंनी गल्लीबोळात फिरुन दुचाकी, अ‍ॅटोला आगी लावल्या. शांतताभंग करण्याच्या हेतूने हा प्रकार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यात एकूण दहा लाखांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.वसमत येथे भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी कडकडीत बंद पाळला होता. बुधवारी महाराष्टÑ बंदचे आवाहन झाल्यानंतर सकाळी बंदबाबत संभ्रम होता. थोडा वेळ काही व्यापाºयांनी दुकाने सुरू ठेवली मात्र बंदचे आवाहन करत कार्यकर्ते फिरल्याने पुन्हा दुकाने बंद राहिली. दिवसभर कडकडीत बंद राहिले. भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देवून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.बंददरम्यान वसमत शहरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कोणतीही अनुचित घटना दिवसभरात घडली नाही. डिवायएसपी शशिकिरण काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यंनी चोख बंदोबस्त ठेवला.दहा लाखांचे केले नुकसानमंगळवारी रात्री शहरातील छोटा तलाब भागात काही उपद्रवीनी सोमवारपेठ भागात शेख कलीम शेख जानी यांच्या घरात असलेल्या मसाल्याच्या गोदामाला खिडकीतून आग लावली यात मसाल्याचे सर्व साहित्य जळून खाक झाले. सदाशिव पटवे यांच्या घरासमोर असलेल्या जुन्या टायरच्या ढिगाला आग लावली. यात पिंजºयात बंदिस्त असलेला पाळीव कुत्रा जळून मरण पावला. सय्यद हसन सय्यद खाजा यांच्या एमएच २० ए.सी. ३७४ या व शेख सलीम शेख नजीर यांच्या एमएच ३८- ३९७२ या आटोला आग लावली. शनिमंदिर परिसरासह विविध भागातील घरासमोर उभ्या असलेल्या पाच दुचाकी उपद्रवींनी पेटवून दिल्या.एकूण दहा लाखांचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसांनी घेतली असून तपास फौजदार मोरे हे करत आहेत.जाळपोळीची घटना शांततेला बाधा उत्पन्न व्हावी, या उद्देशानेच काही जणांनी केली असावा, असा संशय पोनि चंदेल यांनी व्यक्त करून सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जागरुक राहण्याचे आवाहन केले.