शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

सिगरेटची तलफ बेतली जीवावर; तोल जाऊन पडल्याने एकजण कालव्यात वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 19:38 IST

औंढा-जिंतूर महामार्गावरून जात असताना गोळेगाव येथे ते जेवण्यासाठी धाब्यावर उतरले.

औंढा नागनाथ : सिगारेट ओढण्याच्या नादामध्ये अचानक तोल गेल्याने कालव्यामध्ये पडून एकजण वाहून गेल्याची घटना सोमवारी रात्री ९.४५ वाजता गोळेगाव येथे घडली. पोलीस प्रशासन सध्या बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.

यवतमाळ जिल्ह्यातील ज्ञानेश्वर उकंडराव डोके ( 40, नारळी, ता. उमरखेड ) हे आपल्या कुटुंबीयांसोबत औरंगाबाद येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात होते. औंढा-जिंतूर महामार्गावरून जात असताना गोळेगाव येथे ते जेवण्यासाठी धाब्यावर उतरले. जेवण झाल्यानंतर डोके यांना सिगारेट पिण्याची तलफ झाली. बाजूच्या पानपट्टीवरुन सिगारेट घेऊन ओढत मागे गेले. मात्र मागे सिद्धेश्वर धरणाचा कालवा तुडुंब भरून वाहत होता. त्यांना याची माहिती नसल्याने ते तसेच पुढे गेले आणि तोल जाऊन कालव्यात पडले. पाण्याचा आवाज झाल्याने नातेवाईकांनी तिकडे धाव घेतली. 

उपस्थितांनी लागलीच याची माहिती औंढा नागनाथ येथील पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना दिली. जमादार अफसर पठाण, इक्बाल शेख व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध सुरु केला. कॅनलला पाणी सुरू असल्याने मंगळवारी देखील या बेपत्ता व्यक्तीचा शोध अद्यापपर्यंत नव्हता. लघु सिंचन विभागाची कर्मचारीदेखील त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोली