शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 01:00 IST

बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे लोकर्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ रोजी दुपारी झाले. यावेळी शिवप्रेमींच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी

हिंगोली : बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे लोकर्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ रोजी दुपारी झाले. यावेळी शिवप्रेमींच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता.यावेळी ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे, खा. अ‍ॅड. राजीव सातव, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. रामराव वडकुते, आ. डॉ. संतोष टारफे, आ.विक्रम काळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी खा. सूर्यकांता पाटील, माजी खा. अ‍ॅड. शिवाजी माने, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी आ.गजानन घुगे, अ‍ॅड. शिवाजी जाधव, जिल्हाधिकारी श्री. रूचेश जयवंशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी.तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, बांधकाम पालिकेचे मुख्य अभियंता एस.एस. घुबडे, सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, मराठा महासंघाचे जावळे पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर, खंडेराव सरनाईक, त्र्यंबक लोंढे, मुख्याधिकारी रामदास पाटील, नगरसेवक जगजीतराज खुराणा, गणेश बांगर, नाना नायक, उमेश गुट्टे, अनिता सूर्यतळ, आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी फडणवीस म्हणाले, अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सर्वांना सोबत घेवून अवघ्या १४ वर्षांचे असताना त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. कुठलाही भेद न करता सुराज्य निर्माण केले. आमच्या स्वातंत्र्य, शौर्य व अस्मितेचे ते प्रतीक आहेत. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम शासनाकडून करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिल्पकार श्री.संताजी चौगुले, वास्तू विशारद चौधरी, कंत्राटदार नईम खान यांचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.सामान्यांतून कौतुकपुढाऱ्यांमध्ये असलेल्या राजकीय हेव्या-दाव्यांची तमा न बाळगता परिसरात जमलेले शिवप्रेमी मात्र कधी एकदा आपल्या लाडक्या राजाच्या पुतळ्याचे अनावरण होते अन् हा सोहळा डोळ्यात साठवता येईल, याच तंद्रीत होते. दुरून का होईना पण या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाल्याची भावना त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होती.एकच गर्दीअनावरणाचा कार्यक्रम संपल्यानंतर पुतळा पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. दूरवरून कार्यक्रम पाहणारे नंतर पुतळा पाहण्यात दंग झाले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस