शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:28 IST

पाणी वेळेवर सोडण्याची मागणीकळमनुरी: मागील काही दिवसांपासून शहरातील नळांना पाणी वेळेवर येईना झाले आहे. त्यामुुळे प्रखर उन्हामध्ये नागरिकांना इतरत्र ...

पाणी वेळेवर सोडण्याची मागणीकळमनुरी: मागील काही दिवसांपासून शहरातील नळांना पाणी वेळेवर येईना झाले आहे. त्यामुुळे प्रखर उन्हामध्ये नागरिकांना इतरत्र पायपीट करावी लागत आहे. नगर परिषदेने याची दखल घेऊन नळांना पाणी वेळेवर सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्यावर खड्डे; वाहचालक त्रस्त

औंढा नागनाथ: शहरातून जाणाऱ्या राज्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच या रस्त्याचे कामही गेल्या काही दिवसांपासून अर्धवटच आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना खड्ड्यांचा अतोनात त्रास होत आहे. वेळीच याची दखल घेऊन राज्य रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

वाहतूक व्यवस्था विस्कळीत

कळमनुरी: शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक मोठमोठी दुकाने आहेत. परंतु, काही दुचाकी व चारचाकी वाहनचालक अस्ताव्यस्तपणे वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेणे गरजेचे झाले आहे.

‘नव्याने गतीरोधक उभारा’हिंगोली: खटकाळी बायपास रोडवरील गतीरोधक गत काही दिवसांपासून धोकादायक बनले आहे. दुचाकी वाहनचालकांनी गतीरोधकाच्या बाजूने रस्ता तयार केला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची दखल घेऊन नव्याने गतीरोधक उभारावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

विजेचा लपंडाव सुरुच

कळमनुरी: गत पंधरा-वीस दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली. परंतु, महावितरण लक्ष देत नाही, अशी ग्राहकांची ओरड आहे.

डुकरांचा मुक्तसंचार

हिंगोली: शहरातील शाहूनगर, कमलानगर, ज्योतीनगर आदी नगरांमध्ये डुकरांचा मुक्तसंचार पहायला मिळत आहे. सकाळच्यावेळी लहान लेकरे अंगणात खेळत आहेत. त्यामुळे डुकरांची भीती वाटू लागली आहे. नगर परिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

बसस्थानकात कचरा

कळमनुरी: शहरातील बरस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढिग साचलेले पहायला मिळत आहेत. गुटख्याच्या पुड्या, नारळे, पाण्याची बॉटल आदी बसस्थानकात परिसरात पडलेले असतात. आगार प्रमुखांना वेळोवेळी सांगूनही याकडे लक्ष दिले जात नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.