तालुक्यातील कयाधू, पूर्णा नदी पात्रातून रात्रीच्या दरम्यान शासनाचा महसूल बुडवत अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी महसूल विभागाच्या पुढे सेनगाव पोलीस यंत्रणा दिसत आहे. अनेक भागात पोलिसांच्या पथकाकडून अवैध वाळू वाहतुकीची वाहने पकडत कारवाई केली आहे. आता तहसीलचे महसूल प्रशासन निवडणूक कामातून उसंत मिळाल्याने अवैध वाळू विरोधात कारवाईसाठी बाहेर पडले आहे. कारेगाव- सिनगीनागा पुलाजवळ अवैध वाळू वाहतुकीचे तीन ट्रॅक्टर तहसीलदार जिवककुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी शेख आल्लाबक्ष, तलाठी पठाण गौस खान, शेख मोहीब, भालेराव यांनी कारवाई करत ही तीन वाहने सेनगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहेत. त्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली असल्याची माहिती नायब तहसीलदार अशोक भोजने यांनी दिली.
फाेटाे नं. १७