शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कारला अपघात; जालन्याचे दोघे ठार

By admin | Updated: May 20, 2017 23:43 IST

तालुक्यातील येळी फाटा येथील शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक व आल्टो कारची येळी फाट्यानजीक

लोकमत न्यूज नेटवर्क
 
औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील येळी फाटा येथील शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक व आल्टो कारची येळी फाट्यानजीक समोरासमोर धडक होवून दोन ठार तर चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
कारमधील प्रवासी जालना येथून नांदेडकडे आल्टो कार क्र. एमएच-१२ व्ही- ७९८५ मधून निघाले  होते. येळी फाट्यानजीक समोरून येणा-या इंडेन गॅसच्या सिलिंडरची वाहतूक करणाºया ट्रक क्र. एमएच-३८- एए- ९२५७ ने या कारला धडक दिली. हा अपघात एवढा भिषण होता की, कारचा चुराडा झाला. नजीकचे हॉटेलचालक पांडु नागरे यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून त्यांच्या मदतीने कारच्या काचा फोडून व मोडतोड करून जखमी व मृतांना बाहेर काढले. यात सत्यनारायण भक्कड (५0), अनिता सत्यनारायण भक्कड (४५) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पुरुषोत्तम भक्कड (५५), ममता पुरुषोत्तम भक्कड (५0), पूर्वा भक्कड (४0), राधिका सत्यनारायण भक्कड (२२) हे जखमी आहेत. दरम्यान, औंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणपत दराडे व सहकारीही तेथे दाखल झाले. जखमींना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉ. आर.सी. वाघमारे यांच्यासह डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिका-यांनी जखमींवर उपचार करण्यासाठी मदत केली. तर १0८ रुग्णवाहिकेसाठी दोन तास प्रतीक्षा करूनही ती जखमींना हलविण्यासाठी उपयोगी पडली नाही. शेवटी नागनाथ संस्थानच्या रुग्णवाहिकेतून रुग्णांना पाठवावे लागले. जखमींना नांदेडला हलविले आहे.