शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ अन्यायकारक शासन परिपत्रक रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:18 IST

कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेल्या पदावरील नेमणुकीच्या अटी व शर्ती तसेच या पदावर नियुक्त कर्मचा-यांच्या सेवा नियमित न करण्याचे शासन परिपत्रक रद्द करण्याची मागणी जिल्हास्तरीय कंत्राटी कर्मचारी समन्वयक समितीने जिल्हाधिका-यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कंत्राटी पद्धतीने निर्माण केलेल्या पदावरील नेमणुकीच्या अटी व शर्ती तसेच या पदावर नियुक्त कर्मचा-यांच्या सेवा नियमित न करण्याचे शासन परिपत्रक रद्द करण्याची मागणी जिल्हास्तरीय कंत्राटी कर्मचारी समन्वयक समितीने जिल्हाधिका-यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले की, ९ फेब्रुवारी २0१८ रोजी शासनाने कंत्राटी कर्मचाºयांबाबत परिपत्रक काढले. ते कंत्राटी कर्मचाºयांवर अन्याय करणारे असल्याचा आरोप केला आहे. गेल्या १५ ते २0 वर्षांपासून राज्यात विविध विभागात कंत्राटी पद्धतीने विहित प्रक्रिया करून कर्मचाºयांची निवड केली जाते. हे कर्मचारी संबंधित विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करतात. सेवेत कायम होण्याच्या आशेने शासकीय सेवेत लागणारे वयही निघून गेले.कायम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करीत असताना ते न करता ११ महिन्यांसाठी जास्तीत-जास्त तीनवेळा नियुक्ती करून पुनश्च भरती प्रक्रिया करण्याचे शासन परिपत्रक काढले आहे. त्यामुळे वय जास्त झाल्याने या निवड प्रक्रियेलाच अपात्र ठरू. ही बाब अन्यायकारक आहे. वास्तविक कंत्राटी कर्मचाºयांची अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.तर अनेक प्रकरणात कंत्राटींच्या बाजूने निर्णय लागला आहे. तरीही त्यावर अंमल नाही. त्यामुळे या नव्या परिपत्रकाचा निषेध करून ते रद्द करण्याची मागणी केली. निवेदनावर शंकर तावडे, प्रथमेश धोंगडे, राजेंद्र सरकटे, प्रशांत भगत, एस.डी. भोजे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहेत.