शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोेली जिल्ह्यात शिष्यवृत्तीसाठी भरविले कॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:14 IST

एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग अंतर्गत तालुकास्तरांवर कॅम्प भरवून माहिती देण्यात आली. महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे आता जि. प. समाज कल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज आॅफलाईन पद्धतीने स्विकारले जात आहेत.

ठळक मुद्देबंद पोर्टलमुळे आॅफलाईन कामे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग अंतर्गत तालुकास्तरांवर कॅम्प भरवून माहिती देण्यात आली. महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे आता जि. प. समाज कल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज आॅफलाईन पद्धतीने स्विकारले जात आहेत.जि. प. समाज कल्याण विभागातर्फे देण्यात येणा-या सर्व शिष्यवृत्ती योजने संदर्भात कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टलवर आॅनलाईन पद्धतीने भरण्याच्या सूचना शासनाकडून होत्या. मात्र पोर्टलमधील वारंवार होणा-या बिघाडामुळे अनेक विद्यार्थ्यांची माहिती भरली गेली नाही. सदर माहिती न भरल्यामुळे शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. परंतु शिष्यवृत्तीसाठी आॅफलाईन पद्धतीने माहिती स्विकारली जात आहे. जि. प. समाजकल्याण विभागा अंतर्गत दिली जाणारी, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, मॅट्रीकपुर्व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना, माध्यमिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना पोर्टलवरून वगळून आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. ज्यांनी अद्याप अर्ज सादर केला नाही, त्यांनी आता थेट जि. प. समाजकल्याण विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेपासून एकही विद्यार्थी वंचित राहिल्यास संबधित मुख्याध्यापकास जबाबदार धरले जाणार आहे.अर्ज सादर करण्याचे आवाहनप्रत्येक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा योजनेचा लाभ मिळावा यासाठी जि. प. समाजकल्याण विभागातर्फे संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी कॅम्प भरून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अर्ज प्रक्रीयेची पद्धत कशाप्रकारे आहे, याचे फॉर्मेट त्यांना देण्यात आले. ठिकठिकाणी कॅम्पचे आयोजन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तोव पंचायत समिती येथे कॅम्प भरून माहिती दिली. हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, औंढा नागनाथ वसमत येथे मार्गदर्शन करण्यात आले. ११ ते १५ जानेवारी दरम्यान आॅफलाईन शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.